आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जी-20 परिषद:सात वर्षांनंतर 25 फेब्रुवारीला हाेणार वेरूळ महोत्सव

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या सात वर्षांपासून विविध कारणांमुळे रद्द हाेणाऱ्या वेरूळ महोत्सवाला अखेर मुहूर्त लागला आहे. ताे २५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान हाेणार आहे. दोन दिवस विद्यापीठ परिसरातील सोनेरी महाल तर एक दिवस वेरूळला या महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिली आहे.

शहरातील कला आणि सांस्कृतिक महोत्सवामध्ये वेरूळ महोत्सवाला विशेष स्थान आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत हा महोत्सव झाला नव्हता. आधी दुष्काळ, त्यानंतर कोरोना व इतर कारणामुळे ताे रद्द करण्यात आला हाेता. तत्कालीन विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांच्या काळात शेवटचा महोत्सव झाला होता. आता जी-२० परिषदेनिमित्त विदेशी पाहुणे औरंगाबादमध्ये येणार असल्यामुळे शहराचे ब्रँडिंग व्हावे या उद्देशाने याच काळात हा महाेत्सव हाेणार आहे. याच्या नियाेजनासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. वेरूळ महोत्सवात नेहमी राष्ट्रीय पातळीवरचे कलाकार सहभागी होतात. यंदा काेणते कलाकार येतील हे पुढील बैठकीत ठरेल. त्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. ती कलाकारांची नावे निश्चित करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...