आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर ठरलं! वेरुळ महोत्सव 25 फेब्रुवारीला:7 वर्षानंतर महोत्सवाचे आयोजन; जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय यांची माहिती

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या सात वर्षापासून प्रलंबीत असलेला वेरुळ महोत्सव यावर्षी होणार आहे. 25 फेब्रुवारीला महोत्सवाची सुरुवात होणार असून 25 ते 27 फेब्रुवारीपर्यंत या महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये दोन दिवस सोनेरी महलमध्ये तर एक दिवस वेरुळला या महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय यांनी दिली आहे.

कोरोनामुळे लांबला महोत्सव

औरंगाबादमध्ये कला आणि सांस्कृतीक महोत्सवामध्ये वेरुळ महोत्सवाची विशेष असे स्थान आहे. मात्र गेल्या काही वर्षात हा वेरुळ महोत्सव झाला नव्हता. दुष्काळ त्यानंतर कोरोना यासह इतर कारणामुळे हा महोत्सव झाला नव्हता. तत्कालीन विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांच्या काळात शेवटचा महोत्सव झाला होता.

जी -20 मुळे घेतला निर्णय

जी - 20 चे लोक औरंगाबादमध्ये येणार असल्यामुळे त्या निमित्ताने औरंगाबादची ब्रँन्डीग व्हावी यासाठी या महोत्सव देखील त्याच काळात आयोजीत केला जाणार आहे. शुक्रवारी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या मध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...