आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठ प्राधिकरणांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. या निवडणुकीत निर्वाचक 6 गण असणार असून, या निवडणुकीत मतदारांना सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करणे अनिवार्य असणार आहे. मात्र, त्याकडे मतदारांनी तूर्तास दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. विविध गणानुसार केवळ 1 हजार 247 मतदारांनी ऑनलाइन नाव नोंदणी केली आहे, अशी माहिती विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी दिली.
कशी कराल नोंदणी?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठ प्राधिकरणांच्या निवडणुकीचा कार्यक्रम शुक्रवारी, 27 मे रोजी जाहीर केला आहे. या निवडणुकीत निर्वाचक 6 गण असणार आहेत. यात अध्यापकांचा गट, प्राचार्यांचा गट, विद्यापीठ अध्यापकांचा गट, व्यवस्थापन प्रतिनिधींचा गट, संलग्न महाविद्यालये व मान्यताप्रात्प परिसंस्था यांच्या विभागप्रमुखांचा गट तर पदवीधरांच्या गटाचा समावेश आहे. या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी मतदारांना 1 जून ते 20 जूनपर्यंत WWW.bamu.ac.in या संकेतस्थळावर Election-2022 या लिंकवर ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी करून अर्ज भरणे अनिवार्य असणार आहे.
अर्ज स्वीकृत केंद्रावर द्या
अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट आवश्यक त्या कागदपत्रास अर्ज स्वीकृत केंद्रांवर सादर करणे बंधनकारक असणार आहे. हे अर्ज घेण्यासाठी प्रशासनाने 7 केंद्र जाहीर केले आहेत. परंतु, या निवडणुकीकडे मतदारांनी कानाडोळा केल्याचे लक्षात येत असून, मतदारांचा नाव नोंदणीसाठी अत्यल्प प्रतिसाद दिसून येत आहे. मागील आठ दिवसांपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या आठ दिवसात केवळ 1 हजार 247 मतदारांनी ऑनलाइन नाव नोंदणी केली असून यातील केवळ दोन टक्के मतदारांनीच हार्ड कॉपी संबंधित मतदान केंद्रांवर जमा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.