आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:राज्यपाल निषेधाचा ठराव कुलगुरूंनी केला रद्द ; कुलगुरू डॉ. प्रमोद येवलेंवर आरोप

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले खोटे बोलत आहेत. त्यांनी कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निषेधाचा ठराव लपवण्यासाठी अधिसभा सदस्यांना ठरावाच्या प्रती दिल्या नाहीत. त्यांच्यात हिंमत असेल तर आपल्याशी जाहीर संवाद करावा, असे खुले आव्हान माजी व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांनी कुलगुरू डॉ. येवले यांना दिले आहे. २३ नोव्हेंबरला खंडपीठाने निंबाळकरांच्या याचिकेत ‘लेटर हेड’चा मुद्दा उपस्थित करत विद्यापीठाला लेटरहेड वापरण्याच्या बाबतीत निश्चित धाेरण करावे, अशा सूचना केल्या आहेत.

निंबाळकर म्हणाले, ‘७ मार्च २०२२ रोजी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिसभेच्या ठरावाच्या प्रती मागितल्या होत्या. कुलगुरूंनी त्या उपलब्ध करून दिल्याच नाही. स्वत:च्या अधिकाराचा दुरुपयोग करत कुलपतींवर निष्ठा सिद्ध करण्यासाठीच कुलगुरूंनी सर्व ठराव दडवून ठेवले आहेत. त्यांना मोठी पदे मिळवायची असतील तर त्यांनी दुसरे उद्योग करावेत, पण बैठकीच्या ठरावांवर सदस्यांचा अधिकार असतो. ते दडवून ठेवण्याचे काम करू नये. नवनिर्वाचित सदस्यांना नव्हे तर प्रशिक्षणाची गरज कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिवांना आहे. स्टॅट्यु्ट्सची अंमलबजावणी कशी करायची, याचे प्रशिक्षण देण्यास तयार असल्याचे निंबाळकर म्हणाले.

ठराव घेतला, मग त्याच्या प्रती देण्यास काय हरकत? महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या महात्मा जोतिराव फुले, सावित्रीमाई फुले, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या विचारांचा अपमान राज्यपालांनी केला आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या निषेधाचा ठराव घेतला होता. तो मंजूरही झाला, पण ठरावाच्या प्रती त्यांनी दिल्या नाहीत. याचा अर्थ झालेला ठराव कागदावर त्यांनी घेतलाच नाही.

बातम्या आणखी आहेत...