आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएस क्रिकेट ट्रॉफी:एलिट क्रिकेट क्लबचा विजय; एसजीएस संघावर 5 धावांनी मात, कृष्णा पवारचे अर्धशतक

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

झालानी टूल्स मैदानावर सुरू असलेल्या पीएस क्रिकेट ट्रॉफी स्पर्धेत एलिट क्रिकेट क्लबने विजय मिळवला. गुरुवारी झालेल्या सामन्यात एलिटने एसजीएस संघावर 5 धावांनी मात केली. या सामन्यात कृष्णा पवार सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना एसजीएसने 18.4 षटकांत सर्वबाद 139 धावा उभारल्या. यात संघाची सुरुवात खराब सलामीवीर अभिजित भगत अवघ्या 8 धावांवर परतला. दुसरा सलामीवीर प्रतिक बोधगिरेने 20 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या आकाश लोखंडेने अर्धशतकी खेळी केली. या खेळीत त्याने 29 चेंडूंत 5 चौकार व 6 उत्तुंग षटकार खेचत 66 धावा ठोकल्या.

मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरले. विजय जाधव (6), धीरज थोरात (2), अंकुर बोधगिरे (1), अंकित जाधव (2) आल्यापावली परतले. प्रविण बी. याने 11 धावा जोडल्या. एलिटकडून हितेश पटेलने 10 धावांत 3 आणि आदर्श जैनने 19 धावा देत 3 गडी बाद केले. आलोक खांबेकरने 2 आणि मंगेश निटूरकर व अजिंक्य पार्थिकरने प्रत्येकी एक-एक गडी टिपला.

कृष्णाचे अर्धशतक, निकित चमकला

प्रत्युत्तरात एलिट संघाने 17.4 षटकांत 5 गडी गमावत 143 धावा करत विजय साकारला. यात निकित चौधरी व अतुल वालेकर जोडीने 26 धावांची सलामी दिली. निकितने 26 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकार खेचत 41 धावा काढल्या. आकाश लोखंडेने त्याला धाव बाद केले. अतुल वालेकरने 11 केल्या. गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी करत 3 बळी घेणारा आदर्श जैन फलंदाजीत भोपळाही फोडू शकला नाही. त्यानंतर आलेल्या कृष्णा पवारने शानदार अर्धशतक झळकावले.

या खेळीत त्याने 39चेंडूंचा सामना करताना 6 सणसणीत चौकार लगावले व 1 षटकार खेचत नाबाद 54 धावांची विजयी खेळी केली. रोहन शाह 5 धावांवर परतला. ओंकार सुर्वेने 12 धावा केल्या. अजिंक्य पार्थिकर 11 धावांवर नाबाद राहिला. एसजीएसकडून अभिजित भगतने 30 धावांत 2 आणि अष्टपैलू आकाश लोखंडेने 31 धावा देत 2 गडी बाद केले.

बातम्या आणखी आहेत...