आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीनदिवसीय स्पर्धा:निनाद, राघव, चंद्राशूची विजय सलामी ; प्रतिस्पर्ध्यावर मात करत विजयी सलामी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा शटल बॅडमिंटन संघटनेतर्फे आयोजित जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत निनाद पाटील, चंद्राशू गुंडले, राघव धुमक, वरद जाधव यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करत विजयी सलामी दिली. वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या कोर्टवर सुरू झालेल्या तीनदिवसीय स्पर्धेत १४० खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.

शनिवारी स्पर्धेचे उद्घाटन भविष्य निर्वाह कार्यालयाचे विभागीय आयुक्त जगदीश तांबे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे सचिव नितीन राठोड, जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष शिरीष बोराळकर व मुख्य पंच मिलिंद देशमुख यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे सचिव सिद्धार्थ पाटील यांनी केले, तर अतुल कुलकर्णी यांनी आभार मानले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी वीरेन पाटील, ऋतुपर्ण कुळकर्णी, जावेद पठाण, नितीन इंगोले, हिमांशू गोडबोले आदी परिश्रम घेत आहेत. मुलांच्या १५ वर्षे गटात निनाद पाटीलने सार्थक वाढवेवर २१-१९, २१-१२, राघव धुमकने अर्णव एकबोटेवर २१-०७, २१-०६ आणि सारंग उगलेने आशुतोष परदेशीवर २१-०६, २१-०५ ने विजय मिळवला.

स्वस्तीदने युगला पराभूत केले १३ वर्षे गटात स्वस्तीद येणगे रेड्डीने युग भगेरियाला अटीतटीच्या लढतीत २१-०८, २०-२२, २१-१३ ने पराभूत केले. हा पहिल्या दिवसाचा रोमांचक सामना ठरला. चंद्राशू गुंडलेने निनाद सोनवणेला २१-०५, २१-०३ ने मात दिली. आदित्य नांबियारने संवेद विद्वांसवर २१-०९, २१-०४ असा विजय मिळवला. दुसरीकडे, आरव इंगोलेने अनय पाडळकरला २१-११, २१-१७, मेधाश राणावतने वरद चौधरीला २१-०६, २१-०४, वरद जाधवने बंधन जैनला २१-१२, २१-१३ आणि प्रियांश जैस्वालने हर्षवर्धन जगतापला २१-०७, २१-१० असा सलग सेटमध्ये पराभव केला.

बातम्या आणखी आहेत...