आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांचा क्रूरपणा कॅमेऱ्यात कैद:रमजानमध्ये उशिरापर्यंत दुकान उघडे ठेवल्याबद्दल दुकानदाराला मारहाण; फौजिया खान यांची कारवाईची मागणी

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभा खासदार फौजिया खान यांनी एक पोलिसांचा क्रूरपणा दाखवणारा एक व्हिडिओ टि्वट केला आहे. हा व्हिडिओ टि्वट करत त्यांनी संबंधित पोलिसावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संबंधित व्हिडिओमध्ये रमजानमध्ये उशिरापर्यंत दुकान उघडे ठेवल्याबद्दल पोलिस दुकानदाराला मारहाण करताना दिसून येत आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये 4 पोलिस कर्मचारी हे सिव्हिल वेशभूषेत दिसत आहेत. पीडित व्यक्ती दुकानाबाहेर तंबाखू चोळत असल्याचे दिसते. यावेळी पोलिसाने आपल्या सहकाऱ्याच्या हातातून लाठी घेतली आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी तो दुकानाच्या दिशेने गेला. तर पोलिस कर्मचारीही त्याच्या पाठीमागे जात त्याला मारताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ पाहून याप्रकारे दुकानादाराला मारणे योग्य आहे, का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. तर अनेकांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे.

पोलिसांची प्रतिक्रिया -
सोने कारागिरला सिटीचौक परिसरात मारहण केल्याप्रकरणी पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले असून संबधित पोलिस हवालदाराला सिटीचौक ठाण्यातून पोलिस आयुक्तालयात पाठविण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...