आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:वैद्यकीय विद्यार्थिनीचे व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेलिंग

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील नामांकित महाविद्यालयातील मेडिकलच्या विद्यार्थिनीला डेटिंग अॅपवर विश्वास ठेवणे चांगलेच महागात पडले. परराज्यातील तरुणाने तिचे व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केले. आता मी काहीही करू शकतो, अशी धमकी देेत ब्लॅकमेल केले. अखेर तरुणीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी राहुलकुमार (रा. बीरगाव, छत्तीसगड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. २५ वर्षीय तरुणीने १३ नोव्हेंबर रोजी प्ले स्टोअरवरून रेव्ह नावाचे अॅप्लिकेशन इन्स्टॉल केले होते. एका महिन्यात दाेघांत मैत्री वाढली व मोबाइल क्रमांक शेअर केले गेले. काही दिवसांपूर्वी त्या तरुणाने तिचे व्हिडिओ एका अॅपवर अपलोड केले.

बातम्या आणखी आहेत...