आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक:पहिल्याच परीक्षेत उद्धव अव्वल, भाजपला भोपळा; आघाडीच्या संघशक्तीचा राज्यभर झेंडा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीने एकजुटीच्या बळावर जोरदार मुसंडी मारली आहे. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ राखतानाच राष्ट्रवादीने पुणे पदवीधर मतदारसंघ ताब्यात घेतला. तर दुसरीकडे, काँग्रेसने पुणे शिक्षक मतदारसंघ जिंकला. हे तीनही निकाल आघाडीसाठी उत्साह वाढवणारे आहेतच; पण नागपूर पदवीधर मतदारसंघाचा कौल खऱ्या अर्थाने आघाडीच्या ‘संघशक्ती’चे दर्शन घडवणारा ठरला. भाजपचा हा सुमारे साठ वर्षांपासूनचा भक्कम गड शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या वज्राघाताने ढासळला. अमरावतीत आघाडी व भाजपला मागे टाकत अपक्ष उमेदवाराची सरशी झाली. धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपला यश मिळाले, तरी पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील अनेक वर्षांची सद्दी आघाडीने संपवली. एकूणच, संघटनकुशल भाजपसाठी धक्कादायक अशा या निवडणुकीने आघाडीची सांघिक शक्ती दाखवून दिली आहे. हा निकाल आघाडीचे नैतिक बळ उंचावणारा ठरला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser