आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोडत प्रक्रिया:विद्या परिषदेचे आरक्षण जाहीर ; प्रत्येकी 2 सदस्य निवडूण येणार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून विद्या परिषदेवर निवडून येणाऱ्या ८ जागांसाठी आरक्षण सोडत प्रक्रिया शुक्रवारी महात्मा फुले सभागृहात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. विद्या परिषदेवर ४ विद्या शाखेतून प्रत्येकी २ सदस्य निवडूण येणार आहेत.

यशस्विता संदीप वानखेडे या बालिकेच्या हस्ते ड्रॉ काढण्यात आला. यात पुढीलप्रमाणे आरक्षण जाहीर झाले. प्रवर्ग महिला- विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, अनुसूचित जाती-विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, अनुसूचित जमाती-वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, वि.जा/भटक्या जमाती-मानवविज्ञान विद्याशाखा, इतर मागास वर्ग-आंतर-विद्याशाखीय विद्याशाखा, तर विज्ञान व तंत्रज्ञान शाखा वगळता अन्य तिन्ही विद्या शाखेतून प्रत्येकी १ जागा सर्वसाधारण असणार आहे. सोडतीसाठी प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. भगवान साखळे, उपकुलसचिव डॉ. विष्णू कऱ्हाळे, सामान्य प्रशासन कक्ष अधिकारी अर्जुन खांड्रे, संजय लांब उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...