आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघाची घोषणा:विपुल, खुशी महाराष्ट्र बास्केटबॉल संघात ; मंगळवारपासून गुजरातला राष्ट्रीय स्पर्धेला सुरुवात

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महा बास्केटबॉल असोसिएशन यांच्या वतीने मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर घेण्यात आलेल्या राज्य संघ निवड चाचणी व शिबिरातून २४ सदस्यीय मुला-मुलींच्या महाराष्ट्र संघाची निवड करण्यात आली. शनिवारी राज्य संघटनेचे सचिव शत्रुघ्न गोखले यांनी संघाची घोषणा केली. महाराष्ट्राच्या संघात औरंगाबादच्या विपुल कड व खुशी डोंगरे यांना संधी मिळाली आहे. हे दोघेही मराठवाड्यातील पहिले आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू आहेत. बास्केटबॉल फेडरेशनच्या वतीने १३ ते १६ सप्टेंबरदरम्यान भावनगर (गुजरात) येथे राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राचे दोन्ही संघ सहभागी होतील. संघ ११ सप्टेंबर रोजी औरंगाबादवरून मुंबई व मुंबईवरून गुजरातला रवाना होणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी औरंगाबादचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक गणेश कड आणि महिला संघाच्या प्रशिक्षकपदी मनजितसिंग दरोगा व सचिन तत्तापुरे यांची राज्य संघटनेतर्फे नियुक्ती करण्यात आली आहे. संघात निवड झालेल्या खेळाडूंचे महाबास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. धनंजय वेळूकर, सचिव शत्रुघ्न गोखले, कोषाध्यक्ष जयंत देशमुख, एमएसएमचे सचिव हेमंत पातुरकर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. मकरंद जोशी, एमएसएम बास्केटबॉल स्पोर्ट््स असोसिएशनच्या उपाध्यक्षा मंदा कड, बिजली आंब्रे, सहसचिव प्रशांत बुरांडे, विश्वास कड, पूजा दुतोंडे यांनी अभिनंदन केले.

महाराष्ट्राचे मुलामुलींचे बास्केटबॉल संघ महिला संघ - साक्षी पांडे, सारा होरा, सिया देवधर, आर्या रिसवाडकर, दुर्गा धर्माधिकारी, आभा लाड, अदिती काळे, खुशी डोंगरे, सुजन पिंतो, पूर्वी महाले, अंशिका कनोजिया, करिना सूर्यवंशी. मुख्य प्रशिक्षक के. एम. निजार अहमद, प्रशिक्षक गणेश कड, संघ व्यवस्थापिका मंदा कड. पुरुष संघ - सिद्धांत शिंदे, एडविन अरविंन, पार्थ शर्मा, राज कालभोर, आरोन माँटेरिओ, विपुल कड, सय्यद मोहंमद युसूफ, समीर कुरेशी, शुभम यादव, किसले राय, साहिल कराळे, यश माने. मुख्य प्रशिक्षक मनजितसिंग दारोगा, प्रशिक्षक सचिन तत्तापुरे, संघ व्यवस्थापक तौफिक खान.

बातम्या आणखी आहेत...