आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारिझर्व्ह बँकेची परीक्षा देण्यासाठी शहरात आलेल्या विकास देवचंद चव्हाण (रा. अल्हनवाडी, ता. पाथर्डी) याची शुक्रवारी निर्घृण हत्या करण्यात अाली हाेती. सिटी चौक पोलिसांनी काही तासांतच संशयित म्हणून पकडलेला ट्रॅव्हल एजंटच मारेकरी असल्याचे निष्पन्न झाले. शाहरुख खान फिरोज खान (२८, रा. जुना बाजार) असे अाराेपीचे नाव अाहे. दिव्यांग असलेल्या विकासजवळील ५०० रुपये लुटण्याच्या इराद्याने त्याने परीक्षा केंद्रावर सोडण्याचे आमिष दाखवून दुचाकीवर बसवून कब्रस्तानात नेले. तेथे मारहाण करून लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, विकासने विरोध करताच त्याने चाकू काढून सपासप वार करत खून करून त्याचा एक हात कापला हाेता.
िचकठलठाणा येथील आयऑन सेंटरवर शुक्रवारी सकाळी ८ वाजता विकासची परीक्षा हाेती. त्यामुळे गुरुवारी रात्री ताे शहरात अाला. बसस्थानकावर मुक्कामासाठी थांबला. पहाटे पाच वाजता शाहरुखने एकटा बसलेल्या दिव्यांग विकासला हेरले. त्याच्याशी बराच वेळ गप्पा मारून विश्वास संपादन केला. लॉकडाऊन असल्याने मी तुला परीक्षा केंद्रावर सोडतो, असे म्हणून त्याने त्याला दुचाकीवर बसवले. त्याच्याजवळील मोबाइल, रोख रक्कम लुटण्याच्या उद्देशाने त्याने मनपाजवळील चितेखाना कब्रस्तानात नेले. संशय आल्याने विकासने विराेध करताच शाहरुखने चाकू काढून अाधी गळ्यावर व नंतर पोटावर सपासप वार करून खून केला.
पाेलिस चौकी बंद का? गुन्हेगारांचा सुळसुळाट, ट्रॅव्हल एजंट थेट आत कसे?
तपास पथकाला दहा हजार रुपयांचे पारितोषिक
सिटी चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार यांच्यासह अंमलदार संजय नंद नऊ वाजेच्या सुमारास घटनेविषयी चर्चा करत हाेते. तेव्हा नंद यांना खबऱ्याने फाेन करून शाहरुख हा विचित्र अवस्थेत फिरत असून तो सकाळी कब्रस्तानातून बाहेर पडल्याचे सांगितले. उपनिरीक्षक काशीनाथ महांडुळे, नंद, संदीप तायडे, देशराज मोरे, माजिद पटेल हे टाऊन हॉल उड्डानपुलाकडे गेले. तेव्हा नशेत तर्र, लालबुंद डोळे झालेला शाहरुख पोलिसांना पाहून पळू लागला. मात्र, पथकाने चारही बाजूने हेरून त्याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याच्याकडे विकासचे आधार कार्ड, पाॅकेट सापडताच तोच खुनी असल्याचे सिद्ध झाले. पाॅकेटमध्ये ५०० रुपये आढळले. अाराेपीला काही तासांतच अटक केल्याबद्दल उपायुक्त निकेश खाटमोडे यांनी पथकास दहा हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले.
शाहरुख रात्रभर फिरत होता
शाहरुख काही महिन्यांपर्यंत एका ट्रॅव्हल्स कंपनीसाठी काम करत होता. मात्र, चार महिन्यांपासून कमिशनवर कोणत्याही वाहनांना प्रवासी मिळवून देत होता. २०१७ मध्ये त्याच्यावर मारहाणीचा एक गुन्हा दाखल आहे. चौकशीत ताे रात्रभर बाहेर फिरत असल्याचे समाेर अाले. संचारबंदी असताना देखील गुरुवारी रात्री इतर एजंट मित्रांसोबत टवाळक्या करत रेल्वेस्थानक, बाबा चौकात फिरत हाेता. पहाटे बसस्थानकावर अाला. ताे आईसोबत जुना बाजारमध्ये राहतो.
कापलेला हात सापडला
िवकासचा खून केल्यानंतर शाहरुखने त्याचा एक हात कापला. पंचनामा करताना पाेलिसांना हात सापडला नाही. कब्रस्तानजवळील परिसरात राहणाऱ्या अब्दुल करीम शेख यांच्या घराच्या छतावर शनिवारी हात सापडला. मांजरीने तो कब्रस्तानातून उचलून नेला असावा, असे पाेलिसांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.