आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''आज माझे वडील वसंतराव काळे यांची आज पुण्यतिथी असून माझ्या विजयामुळे मला निवडून दिलेल्या शिक्षकांनी माझ्या वडीलांना एकप्रकारे आदरांजली वाहीली अशी माझी भावना आहे. अशा शब्दात विक्रम काळे यांनी आपल्या विजयावर मत व्यक्त केले. ''मी केलेल्या कामामुळेच माझा विजय झाला.'' असा दावा करत प्रतिस्पर्धी सूर्यकांत विश्वासराव यांनी केलेले आरोप फेटाळून लावत पराभवामुळेच त्यांनी आरोप केल्याचे विक्रम काळे यांनी सांगितले.
मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत विक्रम काळे यांचा विजय निश्चित मानला जात आहे, त्यामुळे मतमोजणी केंद्राच्या बाहेर हार घालून त्यांचे स्वागत देखील करण्यात येत आहे. विक्रम काळे यांनी सलग चौथ्यांदा या निवडणुकीत विजय मिळवला.
एकच पसंत विक्रमी पसंत
विक्रम काळे यांच्या मतात मध्ये सातत्याने वाढ होत आहे त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात असून केवळ घोषणा होणे बाकी आहे. मताचा कोटा पूर्ण न झाल्यामुळे दुसऱ्या पसंतीची मते मोजली जात आहेत. जर्मन मतमोजणी केंद्राच्या बाहेर केवळ एकाच पसंत विक्रमी पसंत अशा घोषणा देखील दिल्या जात आहेत.
विश्वासरावांच्या आरोपांवर खंडन
''विक्रम काळे यांनी सत्ताधाऱ्यांना आमिष दाखवून तसेच संस्थाचालकाच्या माध्यमातून दबाव टाकून विजय हिरावून घेतला'' असा प्रतिस्पर्धी सूर्यकांत विश्वासराव यांनी विक्रम काळेंवर केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना काळे म्हणाले की, पराभव झाल्यानंतर अशी टीका केली जाते. शिक्षकांचे मतदान हे गुप्त असते. त्यामुळे दबाव टाकण्याचा कुठलाच प्रश्न येत नाही. यामधून त्यांची नैतिकता दिसते.
बाद मते उत्साहात झाली
मराठवाडा शिक्षक मतदार संघात अडीच हजार मते बाद झाली आहेत. या बाबत विचारले असता उत्साहाच्या भरात हि मते बाद झाली असल्याचे विक्रम काळे यांनी 'दिव्य मराठी' बोलताना सांगितले.
आठव्या फेरीअखेर विक्रम काळे 20195 मते
दुसऱ्या पसंतीची आठव्या फेरी अखेर विक्रम काळे यांना 20195 तर तर किरण पाटील यांना 13570 मते मिळाली आहेत. तर सूर्यकांत विश्वासराव यांना 13604 मते मिळाली आहेत. तर मनोज पाटील यांना 1102 मते मिळाली आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.