आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळा दिवस:कार-ट्रॅव्हल्स अपघातात ग्रामसेवक ठार, रस्त्यावर विखुरले गेले अवयव; वडवणीहून बीडकडे जाताना घडली भीषण दुर्घटना

वडवणी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कार-ट्रॅव्हल्स अपघातात कारची अशी अवस्था झाली होती.

कामानिमित्त कारने वडवणीहून बीडकडे निघालेल्या ग्रामसेवकाच्या कारला पुण्याहून येणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्सने जोराची धडक दिली. यात ग्रामसेवकाचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, ग्रामसेवकाचे शरीराचे तुकडे रस्त्यावर विखुरले होते. उरलेला मृतदेह कटरने कारचा पत्रा कापून बाहेर काढावा लागला. दरम्यान, अपघातानंतर ट्रॅव्हल्स झाडाला जाऊन धडकली. ट्रॅव्हल्समधील एकाही प्रवाशाला इजा झाली नाही. वडवणी-परळी राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी पहाटे ५ वाजता हा अपघात घडला.

वडवणी तालुक्यातील देवी येथील रहिवासी ग्रामसेवक राजेंद्र श्रीरंग मुंडे (४१) हे कामानिमित्त पहाटेच गावाहून बीडकडे आपल्या कारने (एमएच ०२ सीपी ५२२६) निघाले होते. वडवणी-परळी राष्ट्रीय महामार्गावर वडवणी शहराजवळ हॉटेल दिनेश परिसरात त्यांच्या कारला पुण्याहून भरधाव येणाऱ्या ट्रॅव्हल्सने (एमएच २९ व्ही ७२२७) जाेराची धडक दिली. समोरासमोर झालेल्या या अपघातात राजेंद्र मुंडे हे कारमध्ये दबले गेले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताचा आवाज वडवणी शहरात ऐकू आला. यानंतर परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. मुंडे यांचा मृतदेह वडवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला गेला.

गेवराई : गढीजवळ दुचाकी-जीपचा अपघात; एकाचा मृत्यू, एक जखमी
तालुक्यातील गढीजवळ दुचाकी व जीपचा समोरासमोर अपघात होऊन एक जण ठार, तर एक जण जखमी झाला. सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. अर्जुन महादेव शेंदरे (४०, रा.रांजणी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे, तर व बाबासाहेब नामदेव शिंदे (३८, रा. शिंदेवाडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव अाहे. गेवराईहून रांजणीकडे जात असताना गढीजवळ समोरून येणाऱ्या जीपने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. जखमीवर गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बीडला हलवण्यात आले आहे.

धारूर : तेलगावात भरधाव कारची दुचाकीला धडक, एकाचा अंत
भरधाव कारने दुचाकीस्वारास दिलेल्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. धारूर तालुक्यातील तेलगाव येथील शिवाजी महाराज चौकात हा अपघात घडला. मारुती श्रीकिसन साबळे (५०, रा. भोपा) हे तेलगाव येथील शिवाजी महाराज चौकात असलेल्या हनुमान मंदिराचे पुजारी आहेत. सध्या धार्मिक स्थळांवर निर्बंध असल्याने केवळ नित्यपूजा केली जाते. त्यामुळे दिवसभर मंदिर बंदच असते. सकाळी पूजा व सायंकाळी दिवाबत्ती साबळे हे करत असतात. मंगळवारी दिवाबत्ती करून परत भोपा येथे जात असताना कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

कटरने कारचा पत्रा कापून मृतदेह काढला बाहेर
अपघातानंतर भरधाव ट्रॅव्हल्स महामार्गालगत असलेल्या झाडाला धडकली. यामुळे ट्रॅव्हल्स थांबली व पलटी झाली नाही. दरम्यान, पहाटे झोपेत असलेले प्रवासी अपघातानंतर दचकून जागे झाले. सुदैवाने ट्रॅव्हल्समधील कुणी जखमी झाले नाही. या ट्रॅव्हल्समधून सुमारे ३० ते ४० प्रवासी प्रवास करत होते.

बातम्या आणखी आहेत...