आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महत्त्वपूर्ण निर्णय:लसीकरण कमी असलेल्या गावांना योजनांचा लाभ नाही, जिल्हा परिषद प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही संपलेला नाही. चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरणावर पुन्हा एकदा भर देण्यात येत आहे. लसीकरणाचे प्रमाण कमी किंवा एकानेही लस घेतली नाही, अशा गावांना कोणत्याही योजनांचा लाभ दिला जाणार नाही. शासन निधीही थांबविण्यात येईल, अशी माहिती औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यंानी दिली.

वारंवार आवाहन करूनही नागरिकांचा हवा तसा प्रतिसाद सध्या शहर असो वा ग्रामीण भागातही मिळत नसल्याचे चित्र आहे. ज्यांचा पहिला डोस घेऊन झाला आहे ते दुसरा डोस घेण्यासाठी येत नाही. तर ज्यांचे दोन्ही डोस झाले आहेत. त्यापैकी बहुतांश जणांनी सुरक्षेसाठी देण्यात येणारा तिसरा बूस्टर डोसही घेतला नसल्याचे गटणे यांनी सांगितले. मे महिन्यापर्यंत १९,७२,३६४ जणांनी पहिला तर १४९२४८७ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्यात २६,२९९ जणांनी बूस्टर डोस घेतला आहे. आतापर्यंत एकूण ३४,६४,८५१ जणांनी लस घेतली आहे. परंतु अजूनही काही गावे अशी आहेत. जिथे शंभर टक्के लसीकरण झालेले नाही किंवा अत्यल्प प्रमाण आहे. तेथे विविध योजनांसाठीचा निधी थांबविण्यात येणार आहे.

मेअखेरपर्यंत लसीकरण टक्केवारी अशी : तालुका डोस दुसरा डोस औरंगाबाद ९४ ६६ गंगापूर ८९ ६३ कन्नड ८० ६४ खुलताबाद ८३ ६४ पैठण ८१ ६१ फुलंब्री ८३ ६८ सिल्लोड ७९ ६३ सोयगाव ८३ ६५ वैजापूर ८० ६१

प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत मोहीम
गावांमध्ये अजूनही लोक प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचाही प्रयत्न सुरू आहे. नीलेश गटणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.

बातम्या आणखी आहेत...