आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:विनायक मेटे राजकारणासाठी मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत, प्रमुख हस्तक्षेप याचिकाकर्ते राजेंद्र दाते पाटील व किशोर चव्हाण यांची टीका

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वीलेखक: संतोष देशमुख
  • कॉपी लिंक

राज्य घटनेनुसारच मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात कायम राहावे, यासाठी आम्ही प्रामाणिकपणे लढतोय. मात्र भाजप षडयंत्र करत असून आमदार विनायक मेटे राजकारणासाठी मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत. त्यांना समाज माफ करणार नाही, असा इशारा प्रमुख हस्तक्षेप याचिकाकर्ते राजेंद्र दाते पाटील व किशोर चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.

पुढे ते म्हणाले की, मंत्रीमंडळ उपसमितीच्या चार बैठका झाल्या आहेत. अध्यक्ष अशोकराव चव्हाण हे दोन वेळा मुख्यमंत्री व आता मंत्री आहेत. त्यांच्या सारखा अभ्यासू व अनुभवी अध्यक्ष मिळणे अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. कायद्याच्या सर्व बाजूंनी त्यांनी माहिती घेतली आहे. उपसमिती सदस्य व विधी तंत्रज्ञांनी विस्तृत चर्चा केली. सर्वोच्च न्यायालयात बाजू सक्षमपणे मांडावी यासाठी नियोजन केले आहे. म्हणजेच महाविकास आघाडी सरकार आपली बाजुने पूर्ण ताकदीनिशी लढत आहे. या बैठकीला मेटे व अनेक सदस्य उपस्थित होते. त्यांना सर्व माहिती असूनही केवळ राजकीय स्वार्थासाठी मेटेंनी काही मराठा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन मराठा आरक्षण समन्वय समितीची स्थापना करून आंदोलन केले. आता दिल्लीला जावून खासदार शरद पवार यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले आहे.

मुळात मेटे यांनी मराठा आरक्षण न्यायालयात टिकावे यासाठी काय केले आहे? हस्तक्षेप याचिका दाखल केली नाही. वकील लावले नाहीत. काय योग्य अयोग्य याबाबत ते आज्ञानी आहेत. असे असताना केवळ राजकारणासाठी चुकीची माहिती देऊन शुद्ध फसवणूक करत आहेत. चव्हाण यांना हटवण्यासाठी राकारण करत आहेत. दुसरे म्हणजे केंद्र सरकार मराठा आरक्षणाची बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी पार्टी व्हायला तयार नाही. अशा प्रकारे भाजप राजकारण करत असून मेटेंचे बोलवता धनी तेच आहेत. सत्य जाणून न घेता बेछुटपणे आरोप करून समाजाची दिशाभूल करत आहेत. हे षडयंत्र थांबवावे. अशी मागणी चव्हाण व दाते पाटील यांनी केली आहे.

श्रेय लाटणाऱ्यांना उघडे पाडणार

याचिकेकर्ते हे मराठा आरक्षण विरोधात आहेत. या सर्वांनी मराठा आरक्षण टिकू नये म्हणून न्यायालयात दावा दाखल केला आहे. असे होणार म्हणून आम्ही सर्व पुरावे गोळा केले. त्याच्या टिप्पणी तयार केले आहेत. सर्व प्रथम हस्तक्षेप याचिका दाखल केली. वकिल लावले असून त्यांना व सरकारला सर्व पुरावे सादर केले आहेत.

असे असताना काही राजकीय मराठा नेते माध्यमांना हाताशी धरून श्रेय लाटण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एका समन्वयकाने आमच्याकडून कागदपत्रे घेतले व ११ पानाची हस्तक्षेप याचिका दाखल केली. स्वत: ला प्रमुख याचिकाकर्ता म्हणू लागले. माध्यमातून तसेच चुकीचे उमटले. म्हणजेच याचिकाकर्ते व हस्तक्षेप याचिकाकर्ते यातील फरक समजून घ्यावे , असा खरमरीत टोला त्यांनी लगावला. तसेच राजकारण करू नका, समाज कपडे ठेवणार नाही, असा निर्वाणीचा इशारा दिला. सरकार कोणतेही असो आम्हाला समाजहित महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले.