आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:विद्यापीठात ‘व्हॉयरॉलाजी‘ अभ्यासक्रम सुरु होणार, गुरुवारपासून ऑनलाईन नोंदणी

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर विद्यापीठात सन २०२१-२२ या शैक्षणिक सत्रापासून ‘व्हायरॉलॉजी‘ हा एक वर्षाचा पदव्यूत्तर पदविका अभ्यासक्रम सुरु केला जाणार आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षित तज्ज्ञ मनुष्यबळनिर्मिती केली जाणार आहे, अशी माहिती पॉल हर्बर्ट सेंटर फॉर डीएनए बारकोडिंग सेंटर‘चे संचालक डॉ.गुलाब खेडकर यांनी दिली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गेल्या वर्षी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली सीएसआर फंडातून कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळा सुरु झाली. या प्रयोगशाळेत विविध कोर्सेस सुरु करण्याचा संकल्प कुलगुरु यांनी जाहीर केला होता. विद्या परिषदेनेही या कोर्सला मंजुरी दिली. त्यानुसार चालु शैक्षणिक वर्षातच हा अभ्यासक्रम सुरु केला जाणार आहे. पहिली बॅच १५ विद्यार्थ्यांची असेल. विद्यापीठ परिसरात ‘डीएनए बार कोडिंग व कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळेसाठी स्वतंत्र इमारत उभारली जात आहे. त्यातच ही अद्ययावत ‘व्हायरॉलॉजी लॅब‘ उभारली जाणार आहे.

देशातील हे पहिलेच विद्यापीठ

यासदंर्भात कुलगुरु म्हणाले की, कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेऊन आपण विद्यापीठाचा मुख्य परिसर व उस्मानाबाद उपपरिसरात दोन कोविंड टेस्टिंग लॅब सुरु केल्या आहेत. एवढयावरच न थांबता कोरोनासारखे नवनवीन विषाणू येत आहेत. त्यांचा शास्त्रीय अभ्यास झाला पाहिजे. या उद्देशाने विद्यापीठात ‘व्हायरॉलॉजी‘ हा एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका सुरु केला जात आहे. दरम्यान, या कोर्सला विज्ञान, वैद्यकीयशास्त्र, फार्मसी या शाखेतील पदवी धारण केलेला विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र असणार आहे. १ एप्रिलपासून या कोर्सची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्यात येणार आहे, असेही डॉ.खेडकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...