आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषाणूचा हल्ला:एच 3 एन 2 संसर्ग चारपट घातक, कोरोनामुळे इम्युनिटीही घटलीय, बचावासाठी मास्क सर्वात उपयोगी

छत्रपती संभाजीनगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एच 3 एन 2 एनफ्लुएंझाला हाँगकाँग विषाणूही म्हटले जाते. यामुळे संसर्ग झालेल्यांना रुग्णालयात भरती करण्याचा दर केवळ ७ टक्के आहे. परंतु याबाबत हयगय नको.

दिव्‍य मराठी एक्स्पर्ट
डॉ. राम शंकर उपाध्याय,
हार्वर्ड मेडिकल युनिव्हर्सिटी, बोस्टन, अमेरिका

{एच3एन2 विषाणूची लक्षणे काय आहेत ?
हा एनफ्लुएंझा विषाणू असून तो श्वासात संसर्ग निर्माण करतो. डब्ल्यूएचओनुसार एच 3 एन 2 एनफ्लुएंझा ए चा उपप्रकार आहे. तसेही एनफ्लुएंझा विषाणू वर्षभर हवेत पसरलेला असतो. परंतु वातावरणातील चढ-उतारामुळे त्याच्या तीव्रतेत वाढ होत आहे. एच3एन2 संसर्गात श्वास घेण्यात अडचण हे त्याचे सर्वात पहिले लक्षण आहे. सर्दी-खोकला, ताप, हगवण, उलटी आणि अंग दुखणे ही लक्षणेही आहेत.

{या विषाणूच्या संसर्गात वाढ का होत आहे ?
सध्या पोस्ट कोरोनाचा काळ आहे. अजूनही देशात कोरोनाचे तीन हजारांवर सक्रिय रुग्ण आहेत. एच 3 एन 2 संसर्गात वाढ होण्याची दोन मोठी कारणे आहेत. पहिले, कोरोनामुळे लोकांची इम्युनिटी कमी होऊन असंतुलित झाली. दुसरे, एच 3 एन 2 विषाणूने रूप बदलले. विषाणूतील या बदलामुळे संसर्ग वाढला आहे.

{हा काेरोनापेक्षाही जास्त घातक आहे का ?
तसे पाहिले तर एच 3 एन 2 कोरोना विषाणूपेक्षा कमी घातक आहे. परंतु, भारतात सध्या चार प्रमुख विषाणू सक्रिय आहेत. कोरोना, एच1एन1, एच3एन2, आणि एडीनो व्हायरस. विषाणू संसर्गात निष्काळजी करणे चांगले नाही. नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार या वेळी एच3एन2 ची तीव्रता पूर्वीपेक्षा चार पट अधिक आहे.

{एच3एन2 पासून कसा बचाव करता येईल?
कोरोना गाइडलाइनचे कठोर पालन करावे लागेल. मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग बचावाची सर्वात चांगली पद्धत आहे. हा संसर्गजन्य रोग असल्याने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. जास्त दिवस खोकला आणि सर्दी राहिल्यास डॉक्टरांकडे जा. एच3एन2 एनफ्लुएंझावर अजून कोणतीही लस नाही. यावरील उपचारात अँटिव्हायरल औषधींचा वापर होतो. आयएमएने एच3एन2 मध्ये डॉक्टरांना अँटिबायोटिक औषधींचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे.

{या विषाणूचा सर्वाधिक धोका कुणाला आहे?
एच3एन2 विषाणूचा सर्वाधिक धोका मुले, वृद्ध आणि आधीपासून आजारांनी ग्रस्त लाेकांना आहे. दीर्घ काळ सर्दी-खोकला राहिल्यास ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांनी डॉक्टरकडे त्वरित जावे. अवयव प्रत्यारोपण केलेले लोक, टीबी आणि कॅन्सरग्रस्तांनी एच3एन2 च्या संसर्गापासून सावध राहावे. वेळीच उपचार घ्यावेत.

बातम्या आणखी आहेत...