आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:बारावीतील तीन मित्रांनी अंधांसाठी बनवला ‘व्हिजन बियाँड’ क्विझ गेम

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • यशोवर्धन कोठारी, देव कपाशी, ध्रुव जव्हेरी यांची निर्मिती; स्वयंसेवी संस्थांना दान करणार

यशोवर्धन कोठारी, देव कपाशी आणि ध्रुव जव्हेरी अवघ्या १७ वर्षांचे हे त्रिकूट. इयत्ता बारावीत शिक्षण घेत असलेल्या यश, देव आणि ध्रुव या तीन जिवलग मित्रांनी अंधांसाठी ‘व्हिजन बियाँड’ हा क्विझ गेम तयार केला आहे. इलेक्ट्रॉनिकवर आधारित टेबलसाइज असा हा गेम खेळण्यासाठी अत्यंत सोपा असून अंध मुलांसोबतच मोठेही त्याचा आनंद घेऊ शकतात.

इलेक्ट्रॉनिकवर आधारित कॉम्प्युटर गेमचे वैशिष्ट्य म्हणजे ब्रेल लिपी येत नसली तरीही सर्वच जण या गेमचा आनंद घेऊ शकतात. हा गेम जनरल नॉलेजवर आधारित असून मुख्यत: ‘कौन बनेगा करोडपती’च्या धर्तीवर प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात आहे. त्यासाठी ‘पायथॉन’ लँग्वेजचा वापर केला आहे. हा गेम बनवण्यासाठी या त्रिकुटाने दीड वर्ष झपाटून काम केले. गेम बनवायचा, त्याचे कोडिंग, डेटाबेस आणि वारंवार ट्रायल घेतली. तसेच, हा गेम अत्यंत सोपा, वापरण्यास सुटसुटीत असावा या दृष्टीने इतर गेम्सचे अवलोकन केले. विविध शाळांमध्ये जाऊन अंध मुलांशी चर्चा केली. गेम खेळताना अंध मुलांना काय समस्या येतात त्याचा अभ्यास केला.

स्वयंसेवी संस्थांना दान करणार

या गेमचा अधिकाधिक लोकांनी आनंद घ्यावा यासाठी त्याचे उत्पादन व मार्केटिंग चांगल्या प्रकारे होणे आवश्यक आहे. हा गेम अंधांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना देण्याचाही विचार आहे. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त अंध मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, असे यश, ध्रुव आणि देव या तिघांनी सांगितले.

ही आहेत गेमची वैशिष्ट्ये

> व्हिजन बियाँड गेम हा एकाच वेळी चार जण खेळू शकतात किंवा दोन अथवा एक व्यक्तीही खेळू शकतो.

> यामध्ये प्रत्येक लेव्हलमध्ये कठीण परीक्षा होते. गुणही मिळतात.

> आपल्याकडे अनेक जणांना अद्यापही ब्रेल लिपी येत नाही. परंतु, हा गेम ब्रेल लिपी येत नसली तरीही खेळता येऊ शकतो.

> या थ्रीडी प्रिंटेड गेमची माहिती http://visionbeyond.org.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अशी सुचली कल्पना

तीन मित्रांपैकी ध्रुवचा भाऊ मोक्ष हा दृष्टिहीन आहे. यशोवर्धन, देव आणि ध्रुव हे ितघे एकदा गेम खेळत असताना मोक्ष त्यात सहभागी होऊ शकत नव्हता. त्यावरून त्यांना सर्वांसाठी एक नवा गेम तयार करण्याची कल्पना सुचली.

कल्पना प्रत्यक्षात आणणे हे आव्हान

अनेक वेळा कल्पना सोपी वाटते, अनेक आव्हाने समोर असतात. ही कल्पना प्रत्यक्षात अाणतानाचा प्रवासही खूपच आनंददायी होता. - यशोवर्धन कोठारी

बातम्या आणखी आहेत...