आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जी -20 परिषद:वेरूळ, अजिंठ्यातील अभ्यागत केंद्रे आता पर्यटकांसाठी राहणार खुली

छत्रपती संभाजीनगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने अजिंठा आणि वेरूळ येथे उभारलेली अभ्यागत केंद्रे जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आली. आता ही दोन्ही केंद्रे पर्यटकांसाठी खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.जागतिक दर्जाच्या सुविधा असलेले वेरूळ अभ्यागत केंद्र कैलास लेण्यांच्या समोर आहे. ही दोन्ही अभ्यागत केंद्रे सुरू होण्यासाठी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा हे आग्रही होते. पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय यांनी ही अभ्यागत केंद्रे जी -२० परिषदेपूर्वी पर्यटकांसाठी सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल आणि कार्यकारी अभियंता विनय वावधने यांच्या पाठपुराव्यांमुळे अभ्यागत केंद्रे आता सुरू झाली आहेत.

दोन्ही अभ्यागत केंद्रांत एमटीडीसीकडून पर्यटकांसाठी सुविधा वेरूळ येथील अभ्यागत केंद्रात ४० बस, १०० चारचाकी आणि २०० दुचाकी उभ्या राहू शकतील असे वाहनतळ. सर्व सुविधायुक्त २५० आसनक्षमता असलेली २ सभागृहे, दोन उपाहारगृहे, स्वच्छतागृहाची व्यवस्था, प्रदर्शनासाठी २ हजार चौरस मीटरचे दालन आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

अजिंठा येथील अभ्यागत केंद्रामध्ये तेथील चार मुख्य लेण्यांची (क्रमांक १, २, १६ व १७) प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. दृकश्राव्य माध्यमातून अजिंठा लेण्यांबद्दल माहिती देणे, वाचनालय, उपाहारगृहे, वाहनतळ व भूरेखांकन आदी सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. यात डोम थ‍िएटर व दृकश्राव्य थ‍िएटरसुद्धा आहेत. या अभ्यागत केंद्रामध्ये एस्केलेटर व लिफ्ट आदी अत्याधुनिक सुविधाही आहेत.

बातम्या आणखी आहेत...