आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने शाळा बंद आहेत व काही शाळांमध्ये ऑनलाइन माध्यमांचा वापर करून शिकवले जात आहे. पण ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असलेले वीज, मोबाइल अशा गोष्टींची उपलब्धता ही सर्वच भागात असते असे नाही. शिवाय ऑनलाइन शिक्षणाचे महागडे ॲप सामान्य विद्यार्थी व पालकांना परवडू शकत नाहीत. परिणामी असे विद्यार्थी भविष्यातील स्पर्धेत मागे पडतील. असे होऊ नये म्हणून बीड जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर आणि अजित कुंभार यांच्या मदतीने पुण्यातील (व्हॉवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन) वोपा या सामाजिक संस्थेने विविध तज्ञांच्या मदतीने राज्यातील सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक प्लॅटफॉर्म सुरू केला आहे.
वापरायला एकदम सोप्पे
- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन निर्मिती करण्यात आली आहे.
- फक्त व्हिडिओचा भडिमार नाही, इतरही रंजक गोष्टींचा वापर.
- एकाच मोबाइलवरून अनेक जण अभ्यास करू शकतील. (लॉग इन किंवा इन्स्टॉल करण्याची गरज नाही)
- शाळा व शिक्षक यांना यात सक्रिय भूमिका बजावता येते
- वापरायला एकदम सोपे (एक धडा एका पानावर- स्क्रोलिंग)
- वही, पेन, पुस्तक, परिसर व शिक्षक यांचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम कमी होईल याची दक्षता घेण्यात आली आहे.
- ssc.vopa.in हा प्लॅटफॉर्म कुठल्याही मोबाइलमध्ये व कोणत्याही इंटरनेट ब्राऊजरमध्ये उघडेल. इतर काहीही करण्याची गरज नाही.
शिक्षणाला नवी दिशा
“नवीन फोन किंवा डिजिटल साधने विकत घेऊन देता येतील अशी बहुतांश पालकांची परिस्थिती नाही. त्यामुळे पाल्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता यावे यासाठी या प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली. अनेक ऑनलाइन एज्युकेशन संस्था अशा शिक्षणाचे महागडे ॲप पालकांच्या माथी मारत आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या ३० दिवसांत १६ लाख वेळा वापरला गेलेला हा प्लॅटफॉर्म ऑनलाइन शिक्षणाला नवी दिशा देत आहे. - प्रफुल्ल शशिकांत, संस्थापक, वोपा (पुणे)
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.