आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोंदणी:छावणी परिषदेच्या सात वॉर्डांत 30 जूनपर्यंत मतदारांची नोंदणी ; याद्यांवर हरकती मागवण्यात येणार

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपाच्या निवडणुकीची तयारी सुरू असताना दुसरीकडे छावणी परिषदेअंतर्गत येणाऱ्या सात वॉर्डांतील मतदारांच्या याद्या तयार करण्याचे कामही सुरू झाले आहे. ३० जूनपर्यंत ही मतदार नोंदणी पूर्ण होईल. त्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मतदार याद्यांवर हरकती मागवण्यात येणार आहेत. छावणी परिषदेअंतर्गत दरवर्षी नवीन मतदार नोंदणी करण्यात येते. २० कर्मचारी सात वॉर्डांमध्ये घरोघरी ओळखपत्र पाहून मतदारांची नोंदणी करून घेत आहे. सध्या छावणीतील सात वॉर्डांमध्ये १७ ते १८ हजार मतदार आहेत. त्यापैकी जवळपास १५०० लष्करातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची नावे आहेत. प्रत्येक रहिवाशाचे घर क्रमांक व त्यातील सदस्यांची माहिती एका रजिस्टरवर नोंदवण्यात येते. त्यानंतर संबंधित व्यक्तीचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी आधार कार्ड पाहून फॉर्म भरून घेऊन फॉर्मवर सही घेण्यात येते.

बातम्या आणखी आहेत...