आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्या परिषद:10 डिसेंबरला मतदान ; 13 डिसेंबरला होणार मतमोजणी

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उर्वरित २९ अधिसभा व विद्यापरिषदेच्या ८ जागांच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झाला आहे. आजपासून अर्ज दाखल करता येणार अहे. १० डिसेंबरला मतदान तर १३ डिसेंबरला मतमोजणी केली जाईल. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी बुधवारी दिली.

कुलगुरू तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. प्रमोद येवले यांच्या निर्देशानुसार अधिसभा, विद्या परिषद, अभ्यास मंडळ आदी प्राधिकरणांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. पहिल्या टप्प्यात पदवीधर प्रवर्गातील १० जागांची निवडणूक २६ नोव्हेंबरला होत आहे. दुसऱ्या टप्प्यात अधिसभेच्या २९ जागांसाठी मतदान होईल. प्राचार्य, प्राध्यापक गटातून प्रत्येकी दहा, तर संस्थाचालक-६, विद्यापीठ शिक्षक गटातून ३ जागा आहेत. विद्या परिषदेच्या ८ जागांसाठीही १० डिसेंबरलाच मतदान होईल. १९ नोव्हेंबर अखेरचा दिवस आहे. १३ डिसेंबरला मतमोजणी होईल. अंतिम मतदार याद्या bamu.ac.in या संकेतस्थळावर आहेत.

बातम्या आणखी आहेत...