आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ:अधिसभेच्या 25 जागांसाठी आज 4 जिल्ह्यांत मतदान

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेच्या २५, विद्या परिषदेच्या ६ आणि अभ्यास मंडळाच्या ३८ जागांसाठी शनिवारी (१० डिसेंबर) सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंच मतदान होत आहे. ४ हजार २०५ मतदार ४ जिल्ह्यांत १७ केंद्रांवर मतदान करतील.

बीड, औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी ५, जालन्यात २ मतदान केंद्रे आहेत. औरंगाबादेतील नाट्यशास्त्र विभागात दोन बूथ असतील. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय (सिल्लोड), शिवाजी महाविद्यालय (कन्नड), विनायकराव पाटील महाविद्यालय (वैजापूर) व प्रतिष्ठान महाविद्यालयात (पैठण) प्रत्येकी एक केंद्र आहे. बीडच्या केएसके आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालय (अंबाजोगाई), भगवान महाविद्यालय (आष्टी), सिद्धेश्वर महाविद्यालय (माजलगांव), बाबूराव आडसकर महाविद्यालयात (केज) प्रत्येकी एक केंद्र असेल. जालन्यात जेईएस महाविद्यालय (जालना), मॉडेल कॉलेज (घनसावंगी) येथे एक केंद्र आहे. उस्मानाबादेत ५ केंद्रे आहेत.

बातम्या आणखी आहेत...