आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामाजिक विचार मंचातर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने मंगळवारी वृक्षदिंडी काढण्यात आली. या वेळी तिरंगा झेंडा घेऊन दिंडीत सहभागी झालेल्या नागरिक व विद्यार्थ्यांनी “भारत माता की जय’ असा जयघोष करत परिसर दणाणून सोडला होता.
दिंडीची सुरुवात के.व्ही. हिंगणकर नाना-नानी पार्क बजाजनगर येथून झाली. गणपती मंदिर येथील भजनी मंडळींनी “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ भजनाने दिंडीतील वृक्षप्रेमींना मंत्रमुग्ध केले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य रेखा नांदूरकर, रेखा हिंगणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गजानन नांदूरकर, केशव ढोले, रवींद्र शेलगावकर, दिलीप दबडे, चिंतामणी शेट्टे, शिवाजी राऊत, सुरेश वंजारी, किशोर सेलकर, गणेश पळसकर, नंदकिशोर कडू, संजय फलटणे, सतीश कोरडे, वसंत कदम, ज्ञानेश्वर धुर्वे, नेमिनाथ खरबडे, चंद्रकांत देशमुख, चांगदेव जगताप, दत्ता सुकासे, सुनील सूर्यवंशी, लहू बोरसे, अमर निकम, ऋषिकेश पाटील, नवनाथ राजे, विलास पाटील, संगीता आवटी, शीतल हिंगणे आदींनी सहकार्य केले. सूत्रसंचालन प्रदीप माळी यांनी केले, तर आभार पोपटराव थोरात यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.