आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिटी बस पोहोचली:महामार्गापासून दीड किमी आत वाळूज स्थानकाला 22 वर्षांपासून बसची प्रतीक्षा

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या तीन लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या सिडको वाळूज महानगर- १ येथे २२ वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून एसटी बसस्थानक उभारण्यात आले. शहरापासून १५ ते २० किलोमीटर अंतरावर असलेल्या या भागातील नागरिकांना मध्यवर्ती बसस्थानकापर्यंत येण्याची वेळ पडू नये या उद्देशाने लाखो रुपये खर्च करून हे स्थानक उभारण्यात आले. मात्र तेव्हापासून इथे एकही दिवस बस आली नाही. आता २२ वर्षांनी सिटी बसची सेवा या स्थानकातून सुरू झाली आहे. मात्र पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसेसनाही या ठिकाणी थांबा देण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. त्यासाठी नागरी विकास कृती समितीच्या वतीने गेल्या सात वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे.

राज्य परिवहन महामंडळाने पुढाकार घेत येथे वाहतूक कार्यालय सुरू केले तर त्याचा फायदा येथील प्रवासी नागरिकांना, कामगारांना होईल. शिवाय लाखो रुपये खर्च करत उभारलेल्या वास्तूचा सदुपयोगही होईल. उल्लेखनीय बाब अशी की, सिडको प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यापूर्वीच संबंधित बसस्थानकाचे हस्तांतरण परिवहन महामंडळाकडे करण्याची तयारी दर्शवलेली आहे. त्यावर अद्याप कार्यवाही झाली नाही.

सेवा सुरू झाली तर उत्पन्न वाढेल वाळूजमधून विदर्भ, खान्देशकडे जाणाऱ्या प्रवाशांना बस पकडण्यासाठी किमान २० किमीचे अंतर पार करून शहरात यावे लागते. प्रशासनाने वाळूजच्या स्थानकातच बस येण्याची सुविधा उपलब्ध करून दिली तर प्रवासी वाढून महामंडळाचे उत्पन्न वाढेल. कारण इकडे रांजणगाव, तिसगाव, साजापूर, जोगेश्वरी, पंढरपूर, वाळूज, वडगाव अशी १७ पेक्षा अधिक गावे व सर्वात मोठा औद्योगिक रहिवासी परिसर थेट जोडला जाईल.

- मुकुंद धर्माधिकारी, नागरिक रहिवाशांची अडचण दूर करावी खूप दिवसांपासून आमची ही मागणी आहे, पण कुणीच लक्ष देत नाही. गरज पडली तर आम्ही एसटी महामंडळाकडे शेकडोंच्या संख्येने जाऊन मागणीसाठी सतत पाठपुरावा करू. प्रशासनाने या भागातील रहिवाशांची अडचण लक्षात घेऊन तरी या स्थानकातून तत्काळ एसटी बस सेवा सुरू करावी यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. - शिवलिंग वडा‌ळे, नागरिक

शहरात उतरून २० किमी लांबून यावे लागते माझे आई-वडील वृद्ध आहेत, ते गावीच राहतात. पण अधूनमधून माझ्याकडे येतात. गावाहून बसमध्ये बसल्यानंतर ते घरी पोहोचेपर्यंत आम्हाला खूप काळजी वाटते. २० किमी दूर शहरातील सिडको बसस्थानकात उतरून मग त्यांना इकडे यावे लागते. आमच्या भागातून बससेवा सुरू झाली तर अधिक सोयीचे होईल. - स्मिता वानखेडे, नागरिक

प्रवाशांच्या वेळेची व पैशाची होईल बचत बसने गावी जाण्यासाठी आम्हाला पंढरपूर तिरंगा चौकात जावे लागते. तिथे ना निवारा आहे ना सुरक्षा. तिथून पुढे रिक्षा किंवा सिटी बसने शहरात जाऊन एसटी बस पकडावी लागते. त्यासाठी वेळेच्या किमान एक तास अगोदरच घरातून निघावे लागते. घराजवळच्या स्थानकात बससेवा सुरू झाली तर ही अडचण कायमची दूर होईल. - सत्यभामा देशपांडे, नागरिक

बातम्या आणखी आहेत...