आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सून:कोकण वगळता राज्यात पावसाचा जोर 10 ऑगस्टपर्यंत कमी राहणार; मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पावसाची प्रतीक्षा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोकण वगळता राज्यात १० ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. राज्यात मान्सून सक्रीय राहण्यासाठी सध्या अनुकूल स्थिती नसल्यामुळे आणि अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा विरून गेल्याने पावसाचा जोर कमी राहील,असे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यातच मान्सूनचा आस नेहमीच्या स्थानावरून काहिसा उत्तरेकडे सरकल्याने हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. जुलै अखेर राज्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत २४ टक्के जास्त पाऊस झाला आहे. मात्र पावसाचे वितरण असमान राहिल्याने उ. महाराष्ट्र कोरडा तर कोकण व द. महाराष्ट्रात पाणीच पाणी अशी स्थिती आहे. मराठवाडा व उ. महाराष्ट्रात जुलैमध्ये जोरदार पाऊस झाला नाही. पुणे वेधशाळेनुसार, तीन ते सहा ऑगस्ट या काळात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात या काळात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

फवारा पावसाने वाढवली चिंता
जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत फवारणी केल्याप्रमाणे पाऊस पडत आहे. त्यामुळे पिकांवर रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. नियंत्रणासाठी शिफारशीनुसार कीटकनाशकांची फवारणी करावी. - डॉ. एस. बी. पवार, विस्तार कृषी विद्यावेत्ता, औरंगाबाद

बातम्या आणखी आहेत...