आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता आठवी) परीक्षेचा अंतरिम निकाल लागून अनेक दिवस उलटले असूनही अंतिम निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष आता अंतिम निकाल व शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणाऱ्या गुणवत्ता यादीकडे लागले आहे.
गेल्या वर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर होऊन अनेक दिवस उलटले आहे. परीक्षा परिषदेतर्फे १२ फेब्रुवारी २०२३ ला परीक्षा घेतली जाणार आहे. पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एकाचवेळी राज्यभरातील केंद्रांवर परीक्षा होईल. या परीक्षेला प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १५ डिसेंबरपर्यंत अर्जांसाठी मुदत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.