आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करान्याय व्यवस्था ही राज्यघटनेची गार्डियन आहे. न्याय व्यवस्थेचे स्वातंत्र्य अबाधित राहिले तरच जनतेचे स्वातंत्र्य राहील. न्याय व्यवस्था स्वत:चे मत मांडू शकत नाही. अशावेळी जनतेने जागरुक राहून चळवळ चालवली पाहीजे. तुम्हाला तुमच्या स्वातंत्र्याची चिंता असेल तर न्याय व्यवस्थेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी जागरुक रहा, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती रविंद्र बोर्डे यांनी केले.
ज्ञान यज्ञ फाऊंडेशन आयोजित पद्म पुरस्काराच्या उद्घाटन सत्रात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर उद्योजक मिलिंद केळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीसीयुडी विभागाचे निवृत्त संचालक डॉ. ए. जी. खान आणि, पद्म पुरस्कार विजेते मिसाईल सायंटिस्ट प्रल्हादा रामारावही उपस्थित होते.
उदघाटनच्या भाषणात बोर्डे म्हणाले, साहित्य, संस्कृती क्रिडा, वैज्ञानिक प्रगती शांततेच्या काळात हाेते. जेव्हा जनतेला स्वातंत्र्य असेल आर्थिक सुबत्ता असेल तेव्हा सृजन होते. आर्थिक, सामाजिक स्वातंत्र्य अबाधित राहीले, तरच सांस्कृतिक, राजकीय, वैज्ञानिक क्षेत्रात विकास होईल. स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी लोकांनी जागरुक राहणे गरजेचे आहे. याची मुळ जबाबदारी न्याय व्यवस्थेची आहे. न्याय व्यवस्था गार्डियन ऑफ कॉन्स्टीटयूशन राईट फंडामेंटल राईट आहे. तिला स्वा:चे मत व्यक्त करता येत नाहीत. मर्यादा आहेत. लोकांमधूनच चळवळ उभी राहीली पाहीजे, ज्यामुळे न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य अबाधित राहील. तरच जनतेचे स्वातंत्र्य अबाधित राहील.
जनतेचे स्वातंत्र्य आबाधित राहीले तरच नवोन्मेश होईल. विकास होईल. हे सर्व एकमेकात गुुंतलेले आहे. जेव्हा न्यायालयीन स्वातंत्र्यावर संकट येते किंवा संकटाची शंका जरी आली, तेव्हा ते मुळापासून नष्ट केले पाहीजे. कायद्याचे इंटरप्रिटेशन करण्याचा अधिकार फक्त न्याय व्यवस्थेला आहे. ज्यामुळे नागरिकांचे मुलभूत अधिकार व्यवस्थित राहतील. हे नाकारणे म्हणजे न्यायव्यवस्थेची पॉवर नाकरणे आहे, याकडे बोर्डे यांनी लक्ष वेधले.
पुर्वी राजवट होती तेव्हा नवरत्न दरबार असायचे. आता आपण लोकशाही व्यवस्थेत आहोत. आपणच रत्न शोधले पाहीजे. आपल्याकडे नुसते रत्न नाहीत तर संपुर्ण आकाशगंगा आहे. यातून आपण स्वयं प्रकाशित तारे शोधले पाहीजेत. याकरिता कोणातही रंग, धूळ नसलेला टेलेस्कोप, दृष्टी आपल्याला विकसित करावी लागेल. तेव्हाच योग्य तारे हुडकता येतील.मिडीयातून माहिती मिळते तेवढेच लोक आपल्यासमोर येतात. पण, या पलिकडील लोक पुुढे आले पाहीजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.