आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Want Maratha Reservation From OBC Only, Government Should Implement Time Bond Policy; Harmful Behavior Should Be Stopped Quickly, Otherwise Outbreak Is Certain Maratha Samwanka

मराठा आरक्षण ओबीसीतूनच हवे:सकल मराठा समाजाची मागणी , तातडीने निर्णय न घेतल्यास उद्रेक निश्चित होण्याचा इशारा

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भूमिहिन, कष्टकरी, अत्यअल्प भूधारक गोरगरीब मराठा समाजाला आरक्षणाची नितांत गरज आहे. त्यामुळे सरकारने ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण द्यावे. यासाठी टाईमबाँड धोरण राबवावे. सारथी, अण्णसाहेब आर्थिक विकास महामंडळाला निधी देताना दुजाभावाची वागणूक देणे त्वरीत बंद करावे. समाजाची संख्या लक्षात घेऊन त्यानुसार भरघोस निधीची तरतूद करावी. अन्यथा उद्रेक होईल, त्यास केंद्र व राज्य सरकार जबाबदार राहील, असा निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला.

ईडब्ल्यूएसचे प्रमाणपत्र देणे बंद झाले आहे. मराठा आरक्षण रद्द झाले. त्यामुळे गोरगरीब विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहात आहेत. सारथी, महामंडळ, कोपर्डी घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षाही झालेली नाही. सर्व प्रश्न सरकारने प्रलंबित ठेवले आहेत. त्यामुळे मराठा तरूणांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विविध मागण्यांचे निवेदन रक्ताने लिहून दिले आहे. त्यावर पहिल्याच अधिवेशनात सकारात्मक निर्णय व्हायला हवा, अशी अपेक्षा समाजाच्या वतीने व्यक्त केली जात आहे. जर काहीच निर्णय झाला नाहीतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मंगळवारी मींट सभागृहात महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती.

बैठकीला मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. दुपारी 12.30 ते 4.30 पर्यंत म्हणजे चार तास चर्चा झाली. प्रत्येकाला समाजाचे प्रश्न मांडण्याची व काय करायला हवे, हे मांडण्याची संधी देण्यात आली होती. त्यानुसार सर्वानुमते ओबीसीतून मराठा समाजाला तातडीने आरक्षण लागू करावे. तोपर्यंत ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ सुरु ठेवावा. प्रमाण पत्र देणे बंद केले आहे ते तातडीने वितरित करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व फडणवीस सरकारने द्यावे. यासह विविध मागण्यांवर एकमाताने निर्णय झाला.

100 जणांचे शिष्टमंडळ मंत्रालयात जाणार

बार्टीला 300 कोटी तर सारथीला 50 कोटी का? असा दुजाभाव त्वरीत बंद करा व समाजाची संख्या लक्षात घेता सारथीला 1 हजार कोटी रुपये निधीची तरतूद करावी. तर अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाल 2 हजार कोटी रुपये निधी द्यावा. जाचक अटी रद्द कराव्यात. हायकोर्टाची स्थगिती नसताना तहसिलदारांनी इडब्ल्यूएस प्रमाणपत्र देणे बंद केले आहे. ते त्वरीत सुरु करावे. मराठा आरक्षणचा प्रश्न निकाली लागत नाही तोपर्यंत ईडब्ल्यूएस आरक्षण हिसकावून घेता येत नाही. मराठा समाजाला टाईबाँण्ड कार्यक्रम द्यावा. आरक्षण कसे देणार, किती दिवसांत देणार, बांटा आयोगाचा अहवाल आल्यानंतर ओबीसी आरक्षणात देखील मराठे समावून घेतले जावू शकतात. त्यासाठी सरकारने निर्णय घ्यावा. सुपरन्युमरीमचा वापर करून प्रतिक्षेतील विद्यार्थ्यांना नोकरीत समावून घ्यावे.

सारथी संस्थेने 3 लाख विद्यार्थ्यांचे उद्दिष्टे जाहीर करावे. मागेल त्यांना शिक्षण द्यावे. आरक्षण मिळेपर्यंत सर्व खासगी शिक्षण संस्थेचा मॅनेजमेंट कोटा ताब्यात घ्यावा व विद्यार्थ्यांना वितरित करावा. हॉस्टेलचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. ठाणे साडले तर कुठेच सुरु नाही. उपलब्ध असलेल्या हॉस्टेल मध्ये जागा आरक्षित करून द्याव्यात. सारथी संस्थेचा पैसा इन्फ्रसाठी नसून विद्यार्थ्यांसाठी आहे. सारथीच्या योजनेपासून विद्यार्थी वंचित आहेत. त्यांना तो लाभ मिळावा, महिला संरक्षण गांभीर्याने पाऊल उचलावे. यासाठी 100 मराठा समन्वयकांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांना भेटण्यासाठी लवकरच जाणार असल्याचा ठराव घेण्यात आला. ड्रग्समुक्त महाराष्ट्राचा संकल्प शहरासह राज्यात विविध ठिकाणी मेडिकल्स, दुकानातून नशेच्या गोळ्या औषधी विक्री होत आहे. यामुळे सर्व समाजातील युवा, तरूण मुलांचे आयुष्य उद्धवस्त होत आहे. याला आळा घालण्यासाठी 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून ड्रग्समुक्त महाराष्ट्रासाठी मराठा क्रांती मोर्चा पुढाकार घेणार, यासाठी अनधिकृत नशेच्या गोळ्या औषधी विकणाऱ्यांवर मराठा क्रांती मोर्चा हातोडा घालणार असल्याचा एकमताने निर्णय घेतला. समिती स्थापन करणारमराठा समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी समिती स्थापन केली जाणार आहे. समितीवर जबाबदारी सोपवली जाणार असून त्यानुसार टाईमबाँण्ड कामे केली जाणार असल्याचाही ठराव समंत करण्यात आला. बैठकीचे नियोजन मुख्य मराठा समन्यवक विनोद पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. अभिजित देशमुख, डॉ. शिवानंद भानुसे, राजेंद्र दाते पाटील, प्रा. चंद्रकांत भराड, माजी नगरसेवक राजगौरव वानखेडे, सुरेश वाकडे पाटील, सुनील कोटकर, आप्पासाहेब कुढेकर पाटील, रेखा वाहटुळे अॅड. सुकन्या भोसले, मनोज गायके, रविंद्र काळे, सतीश वेताळ, राजेंद्र जंजाळ, रमेश गायकवाड, विविध सामाजिक, राजकीय संघटनेतील मराठा पदाधिकारी, विद्यार्थी, विद्यार्थींनी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...