आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यक्षांनी घेतली आढावा बैठक:वक्फ बोर्डाची नोंदणी ऑनलाइन करणार : अध्यक्ष डॉ. मिर्झा

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र वक्फ बोर्डात वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया चालू महिन्यातच राबवली जाणार असल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष डॉ.वजाहत मिर्झा यांनी दिली. आज पाणचक्की येथील बोर्डाच्या मुख्य कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. रखडलेल्या भरतीनंतर संस्था नोंदणीच्या प्रक्रियेस गती मिळेल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. राज्यातील संस्थांना बोर्डातील नोंदणीसाठी औरंगाबादला यावे लागते. या महिन्याच्या अखेरीस ऑनलाइन नोंदणीकरणाची प्रक्रिया राबवणार असल्याचेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...