आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कोठडी:प्रभाग रचनेचा आराखडा फोडणाऱ्यास कोठडी; मनपात मदत करणाऱ्यांचीही होणार चौकशी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रभाग रचनेचा गोपनीय आराखडा फोडून व्हायरल केल्याप्रकरणी सिटी चौक पोलिसांनी मनपातील कंत्राटी संगणक चालक काझी इम्तियाज सोहेल काझी फवाद (३०, रा. बुढीलेन, डायमंड फंक्शन हॉलजवळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून मंगळवारी त्याला अटक केली. बुधवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.व्ही. खेडकर-गरड यांनी त्याला ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

सुरुवातीला आराखडा फुटला नसल्याचा दावा करणाऱ्या मनपा प्रशासनानेच नंतर काझीविराेधात पाेलिसात तक्रार दिली. सहायक आयुक्त तसेच निवडणूक अधिकारी विक्रम दगडू दराडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. २७ मे रोजी मनपाने हा आराखडा निवडणूक आयोगाकडे पाठवला.

त्यांनी मंजुरी दिल्यानंतर २८ मे रोजी तो व्हायरल झाला. चौकशीत काझी याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. दरम्यान, आरोपीला मदत करणारे कोण, त्याने गुन्ह्यात वापरलेले हार्डडिस्क याची चौकशी करायची असल्याचे पोलिसांनी कोर्टात सांगितले.

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना शासनाच्या वतीने मदत करण्याचे जाहीर केले आहे. काही संस्थाही सामाजिक दायित्व म्हणून अशा विद्यार्थ्यांना मदतीसाठी हात पुढे करत आहेत. देवगिरी महाविद्यालयात अकरावी, बारावीत प्रवेश घेणाऱ्या अशा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च आपण करणार असल्याची माहिती संस्थेचे प्रमुख तथा आमदार सतीश चव्हाण यांनी दिली. त्यांना पुस्तकेही दिली जातील. प्राचार्य डॉ. एन. जी. गायकवाड यांनीही पाच विद्यार्थ्यांची जबाबदारी घेतली.

बातम्या आणखी आहेत...