आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबादमध्ये मोतीचूर लाडू, चॉकलेट देऊन शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. तब्बल दोन वर्षानंतर शाळा निर्धोकपणे सुरू झाल्याचा आनंद शिक्षकांच्या तोंडावर यावेळी दिसला.
कार्टूनचे मुखवटे घातले
गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे बिघडलेली शिक्षणाची घडी पुन्हा सुधारण्यासाठी सोमवारपासून शाळा सज्ज झाल्या. विद्यार्थ्यांना आपल्या वर्ग मित्रांसह शाळेची गोडी निर्माण व्हावी, पुन्हा अभ्यासात मन रमावे यासाठी विविध उपक्रम राबवितांना शाळा दिसून आल्या. सोमवारपासून शाळा सुरू झाल्याने उन्हाळी सुटीत सुनेसुने झालेले शाळेचे अंगण विद्यार्थ्यांच्या आगमनाने फुललेले दिसून आले. शाळेचा पहिला दिवस आज प्रवेशोत्वाने साजरा करण्यात आला. यानिमित्त खास मुलांना पोषण आहारात मोतीचुरचे लाडू, त्यांच्या आवडीचे चॉकलेट्स, फुल आणि कार्टूनचे मुखवटे देखील भेट देण्यात आले.
प्रवेशोत्सव उत्साहात
शाळेचा पहिला दिवस सर्वत्र प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त मुलांचे स्वागत अगदी धडाकेबाज करण्यात आले. काही शाळांमध्ये मुलांना मिठाई, पुष्पगुच्छ देवून औक्षण करण्यात आले. तर काही ठिकणी मुलांच्या प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या. शहरातील मुकुल मंदिर, प्ले स्कूल, जिल्हा परिषद, मनपा प्रियदर्शनी शाळा, आ. कृ. वाघमारे, शारदा मंदिर, सरस्वती भुवन प्रशाला इथे तर छोट्या विद्यार्थी मित्रांसोबत शाळेच्या ताईंनी बालगीतांवर ठेका धरला.
अधिकाऱ्यांनी केली पाहणी
पहिल्यांदाच शाळेत येण्याचा आनंद बालवर्ग आणि पहिलीच्या वर्गातील मुलांच्या चेहऱ्यावर दिसून आला. यावेळी पालकांचे समुपदेशन करत त्यांच्याशी नव्या शैक्षणिक वर्षासंदर्भात शिक्षकांनी चर्चाही केली. विद्यार्थ्यांना शाळेची ओळख करून देण्यात आली. कोविड-१९ चे सर्व नियम पाळत आणि शाळांचे निर्जंतूकीकरणही शाळा भरण्यापूर्वी करण्यात आले होते. तर उन्हाळी सुटीतील अनुभवही विद्यार्थ्यांनी यावेळी शिक्षकांना सांगितले. दरम्यान शहरासह ग्रामीण भागातील शाळांवर अचानक भेट देवून शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी शाळा प्रवेशोत्सवाची प्रत्यक्ष पाहणी देखील केली .
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.