आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:रेल्वेत नोकरीचे अमिष दाखवून वसमतच्या तरुणाची 10 लाख रुपयांची फसवणुक

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उत्तरप्रदेशातील तरुणा विरुध्द वसमत पोलिस ठाण्यात गुन्हा

वसमत येथील एका तरुणास रेल्वेत नोकरी लावण्याचे अमिष दाखवून १० लाख रुपयांची फसवणुक केल्या प्रकरणी उत्तरप्रदेशातील बोडेपूर येथील एका तरुणा विरुध्द वसमत पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. १३ रात्री उशीरा गुुन्हा दाखल झाला आहे. संतोष बनवारीलाल सरोज (३८, रा. घरनंबर १६, बोडेपूर, ता. मछलीशहर, जिल्हा जोनपुर, उत्तरप्रदेश) असे आरोपी तरुणाचा नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील पंडीत सुधाकर ढवळे हा शिक्षण घेतो. उत्तरप्रदेशातील बोडेपूर येथील संतोष सरोज या तरुणाशी त्याची गाठभेट झाली. त्यानंतर संतोष याने त्यास रेल्वेमध्ये नोकरी लाऊन देतो असे अमिष दाखविले. त्यासाठी पैसे लागतील असे सांगितले. नोकरी लागत असल्याने पंडीत ढवळे यांच्या कुटुंबाने संतोष यास ता. १९ जुलै २०१८ ते ता. ३१ जुलै २०१९ या कालावधीत बँक ऑफ इंडिया शाखा वसमत व नांदेड मर्चंट बँक शाखा वसमत बँकेतील खात्यावर वेळोवेळी पैसे भरण्यास सांगितले. त्यानंतर पंडीत यांनी १० लाख रुपयांचा भरणा केला.

दरम्यान, दहा लाख रुपयांची रक्कम मिळाल्यानंतर संतोष याने रेल्वेतील नोकरीचे दिल्ली येथील बनावट आदेश दिले. मात्र त्याबाबत संशय आल्याने पंडीत ढवळे यांनी थेट दिल्ली येथे जाऊन नियुक्ती आदेशाची खात्री केली. मात्र सदर आदेश बनवाट असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच पंडीत ढवळे यांनी संतोष याच्या कडे पैसे परत देण्याची मागणी केली. मात्र संतोष पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. मागील काही दिवसांपासून त्याने पंडीत ढवळे यांचा दुरध्वनी घेण्याचेही टाळण्यास सुरवात केली. अखेर त्यांनी गुरुवारी ता. १३ रात्री वसमत शहर पोलिस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी संतोष बनवारीलाल सरोज याच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे, सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीदेवी पाटील पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...