आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलकुंभ बांधणे आवश्यक:10 नव्या टाक्या बांधून जुने पाइप बदलले तरच 3 दिवसांनी पाणी

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराला तीन दिवसांआड पाणी देण्यासाठी किमान १० नवे जलकुंभ बांधणे आवश्यक आहे. जुन्या ७०० मिमीसह शहरातील अंतर्गत पाइपलाइन बदलावी लागेल. हे काम झाले तरच दीड महिन्यात तीन दिवसांआड पाणी देणे शक्य आहे.शहराला रोज २३० एमएलडी पाण्याची गरज आहे. सध्या जायकवाडीतून १२५ एमएलडी आणि हर्सूल तलावातून दहा एमएलडी पाणी मिळते. तीन दिवसांआड पाणी देण्यासाठी साठव क्षमता वाढवणे आवश्यक आहे, असे एमजेपी व मनपातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांचे मत आहे. सध्या २५ नवीन जलकुंभ बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र ते अतिशय संथगतीने सुरू आहे. यातील अत्यावश्यक दहा जलकुंभ निश्चित करून त्याचे काम तातडीने मार्गी लावावे लागेल.

अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याच्या मोहिमेला अजून वेग दिला पाहिजे. अनधिकृत नळांमुळे शहरातील अनेक ठिकाणी पाइपलाइनची चाळणी झाली आहे. ही पाइपलाइन बदलावी लागेल. जुनी ७०० मिमीची पाइपलाइन बदलल्यास ७५ एमएलडी पाणीपुरवठा वाढेल. यासाठी नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प तयार करावा लागेल. शिवाय नवीन जास्त क्षमतेचे पंपसुद्धा बसवावे लागतील. हर्सूल तलावाचे पाणी शुद्ध करण्यासाठी नवे जलशुद्धीकरण केंद्र सुरू करावे लागेल. ही सगळी कामे दीड महिन्यात पूर्ण झाली तर तीन दिवसांआड पाणी देणे शक्य होईल.

पाच मंत्री हैं तो मुमकिन है
केंद्रात डाॅ. भागवत कराड, रावसाहेब दानवे मंत्री आहेत. राज्यात अतुल सावे, संदिपान भुमरे आणि अब्दुल सत्तार औरंगाबादचे प्रतिनिधित्व करतात. कुठलाही प्रस्ताव पाठवा, आम्ही दिल्ली-मुंबईतून मंजूर करून आणतो असे आश्वासन या मंत्र्यांनी दिले आहे. तेव्हा शहरात ‘पाच मंत्री हंै तो सबकुछ मुमकिन है’ अशी भावना औरंगाबादकरांमध्ये आहे.

बातम्या आणखी आहेत...