आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलवाहिनी फुटली:शहरातील काही भागात आज 12 ते 15 तास उशिराने पाणी

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवडगावजवळ जुनी ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी शुक्रवारी फुटली. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने २७ तासांत दुरुस्ती केल्याने शनिवारी सायंकाळी सहा वाजता शहरात पाणी येण्यास सुरुवात झाली. मात्र, जुन्या शहरातील पाणी वितरणावर परिणाम झाला आहे. २० नाेव्हेंबरला अनेक भागांना १२ ते १५ तास उशिराने पाणीपुरवठा होणार असल्याचे मनपाच्या अभियंत्यांनी सांगितले.शुक्रवारी दुपारी ३ वाजता नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असताना जलवाहिनी फुटली हाेती. मनपाने जायकवाडीतील तीन पंप बंद करून शनिवारी दुपारी ४ वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण केले. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता नक्षत्रवाडी येथील सम्पमध्ये पाणी येण्यास सुरुवात झाली.

शुक्रवारी दुपारनंतर या जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद झाल्याने अनेक जलकुंभ कोरडे झाले. त्यामुळे शुक्रवारचे टप्पे एक दिवस पुढे ढकलण्यात आले. शनिवारी नक्षत्रवाडी, कांचनवाडी, वेदांतनगर, सिल्क मिल कॉलनी, सादातनगर, विश्वभारती कॉलनी, क्रांती चौक येथील जलकुंभ कोरडेठाक पडले. त्यामुळे या भागाचा पाणीपुरवठा बारा ते पंधरा तास उशिराने केला जाणार आहे. शनिवारचे रात्रीचे टप्पे रविवारी दुपारनंतर पूर्ण केले जातील, असे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...