आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाष्पीभवन:औरंगाबाद अन‌ जालन्याला आठ दिवस पुरेल इतक्या पाण्याचे जायकवाडीतून रोज बाष्पीभवन, रोज दीड दलघमी पाण्याची वाफ, पाणीसाठा आला 65 टक्क्यांवर

पैठण4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या चार दिवसांपासून उष्णतेचे प्रमाणात वाढले आहे. पारा ३९ ते ४० अंशांवर पाेहोचला असून जायकवाडी धरणातील पाण्याच्या बाष्पाचे प्रमाण दुपटीने वाढले. यापूर्वी चार दिवसांत जेवढे बाष्पीभवन होते ते आता केवळ दाेन दिवसांत होत असल्यामुळे धरणाची पाणीसाठ्यात घट होत आहे. दररोज दीड दलघमी पाण्याची वाफ होत असून आैरंगाबाद-जालन्याला ८ ते १० दिवस पिण्यासाठी जेवढे पाणी लागते तेवढ्या पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली.

या चार दिवसांच्या बाष्पीभवनाचा विचार करता रोज वाळूज, औरंगाबाद जिल्ह्यातील चितेगाव, चिकलठाणा, पैठण एमआयडीसी आणि बिडकीन-शेंद्रा डीएमआयसीतील हजारो कंपन्यांसह साडेचारशे गावांना पिण्यासाठी ८ ते १० पुरेल एवढ्या पाणीसाठ्याची बाष्पीभवनाच्या माध्यमातून प्रति २४ तासात वाफ होत आहे. हे बाष्प मागील तीन वर्षांच्या तुलनेत अधिक आहे.

कालव्यांतून पाणी सोडले
जायकवाडी धरणाचे पाणलोट क्षेत्र २१,७५० चौ.किमी असून धरण उथळ असल्याने पाण्याचे बाष्प लवकर होते. रोज साधारणपणे एक दलघमी होणाऱ्या बाष्पीभवनाच्या तुलनेत या चार दिवसांत त्याचे प्रमाण दीड दलघमीवर आले आहे. शुक्रवारी १.६५२ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन झाले. दरवर्षी होणाऱ्या बाष्पीभवनाच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. यात सध्याचा पाणीसाठा जरी मुबलक असला तरी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून सिंचनाला पाणी सोडले जात असून बाष्पीभवनाचे वाढते प्रमाण पाहता जायकवाडीच्या पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे.

बाष्पीभवनाचे प्रमाण चार दिवसांमध्ये वाढले, रोजच पडतेय यात भर
जायकवाडीचा पाणीसाठा ६५.३६ टक्के असला तरी दोन्ही कालव्यांतून सिंचनाला पाणी सोडले जात आहे. त्यात बाष्पीभवनाच्या प्रमाणात या चार दिवसांत प्रचंड वाढ झाली आहे. औरंगाबाद, जालन्याला ८ ते १० जेवढे पाणी लागते त्याहून अधिक पाण्याचे बाष्पीभवन रोज होत आहे. यामुळे जायकवाडीचा पाणीसाठा कमी होत आहे. मागील चार दिवसांत बाष्पीभवनाच्या वाढीत भर पडली आहे.
-विजय काकडे, अभियंता, जायकवाडी पाटबंधारे.

1.जायकवाडी येथील पाटबंधारे विभागाच्या मुख्य कार्यालयाच्या मागे ४८ वर्षांपूर्वीच मॉड्यूल टाइप ‘बाष्पीभवन मापक यंत्र’ (ई-ऑपरेशन पॅन) ठेवले आहे.

2.पॅनमध्ये रोज सकाळी ६ वाजता पाॅइंटर असलेले चंचुपात्र ठेवले जाते. याला खाली छिद्र असते. पॅनमधील पाणी चंचुपात्रात जाते व पाण्याचा स्तर स्थिर होतो व पॉइंटरच्या लेव्हलपर्यंत तो स्तर दिसतो. पॉइंटरपर्यंत पाणी येईपर्यंत त्या पॅनमध्ये पाणी टाकले जाते व दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत बाष्पीभवन होऊन चंचुपात्रातील पाण्याचा स्तर खाली जातो.

3.नंतर रिकाम्या दुसऱ्या चंचुपात्रात पाणी घेतले जाते. जितक्या उंचीपर्यंत पाणी येते तेवढे बाष्पीभवन झाले असा निष्कर्ष काढला जातो. त्यानंतर सकाळी ६ वाजता धरणाच्या सरफेस एरियानुसार पाणी पातळी मोजून त्याला पॅनमधून मिळालेली एमएममधील डेप्थ गुणिले केल्यानंतर किती पाण्याचे बाष्पीभवन झाले हे कळते.

असा आहे धरणाच्या पाण्याचा दोन जिल्ह्यांतील दररोजचा वापर
150 एमएलडी औरंगाबादला पिण्यासाठी रोज
50 एमएलडी औरंगाबाद ग्रामीण पाणीपुरवठ्यास
21 एमएलडी जालन्याला पिण्यासाठी लागते.
1.652दलघमी बाष्पीभवन दररोज होत आहे.
0.500 दशलक्ष घनमीटर बाष्पीभवन उन्हाळा नसताना होते.

बातम्या आणखी आहेत...