आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीटंचाई:घाटीत पाण्याचा ठणठणाट; वसतिगृहात निर्जळी, पिण्याचे पाणी घ्यावे लागते विकत

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) दाेन दिवसांपासून पाणी नाही. त्यामुळे रुग्ण, नातेवाइकांसह वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. सर्जरी विभागाकडून तक्रार येताच घाटी प्रशासनाने गुरुवारी सायंकाळनंतर पाणी मागवले. घाटी परिसरात निवासी डॉक्टरांची निवासस्थाने, डॉक्टर व कर्मचारी, मुला-मुलींचे वसतिगृह, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. याशिवाय ३० पेक्षा अधिक वॉर्ड, २१ विभाग आहेत.

ओपीडीत रोज एक हजार रुग्ण तपासणीसाठी येतात. याशिवाय हजारपेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल असतात. येथे मनपातर्फे पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु, सर्जरी विभागात गेल्या दोन दिवसांपासून पाणी नसल्याने रुग्ण, नातेवाइकांची गैरसोय झाली. शौचालयात पाणी नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून पाणी आणावे लागले. घाटीला ७ लाख लिटर पाण्याची गरज भासते. त्या तुलनेत अपुरा पुरवठा होत असल्याने काही वॉर्ड, विभागांमध्ये पाण्याचा ठणठणाट जाणवत असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...