आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर व चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रास पाणीपुरवठा केला जातो. मृदू पोलादी जुनी जलवाहिनी बदलण्याचे काम प्रगतिपथावर आहे. संग्रामनगर उड्डाणपुलाजवळ एमआयडीसीची नवीन जलवाहिनी जुन्या जलवाहिनीस जोडण्याचे काम शुक्रवार ते सोमवार (३ ते ६ मार्च) यादरम्यान करण्यात येणार आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंत्यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.