आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या बाहेर मा.आ.हर्षवर्धन जाधवांचे आमरण उपोषण:शहरातील पाणी प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी जाधवांचा आक्रमक पवित्रा

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात भीषण पाणी प्रश्न असताना महानगरपालिकेने मागील दहा वर्षात अर्थसंकल्पात पाण्यासाठी अत्यल्प तरतूद केली होती. चालू वर्षीही त्याचीच पुनरावृत्ती होत आहे. त्यामुळे सिमेंट रस्ते सह इतर बाबींवर होणारा खर्च कमी करून तो शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी करण्यात यावा. तसेच मनपा अर्थसंकल्पात पाणी प्रश्न सोडवण्यासाठी भरघोस तरतूद करण्यात यावी. या मागणीसाठी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारती समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

शहरातील महानगरपालिकेत मागील दहा वर्षात 6280 सहा हजार कोटी जमा झाले होते. त्यापैकी केवळ सहा 652 कोटी खर्च पाणीपुरवठावर करण्यात आला. तसेच वर्ष 2022 -23 साठी तयार करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातही 1728 कोटीची जमा होणार आहेत. त्यापैकी 1726 कोटी खर्च करण्यात येणार आहे. त्यापैकी केवळ 112 कोटी खर्च हे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील भीषण पाणीटंचाई दूर होणे अशक्य आहे. महानगरपालिका प्रशासनाने अर्थसंकल्पामध्ये जास्तीत जास्त तरतूद ही पाणीपुरवठासाठी करावी. तसेच शहरातील सिमेंट रस्ते व इतर कामांमध्ये कमी खर्च करून तो पैसा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी वापरावा. अशी मागणी रायभान जाधव विकास आघाडीचे अध्यक्ष व कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी महानगरपालिका प्रशासनकीय इमारती समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

पाण्यासाठी जास्त तरतूद नाही

महानगरपालिकेमध्ये ठेकेदार व नेते मंडळींना रस्ते व इतर कामांमध्ये 15 टक्के पर्यंत टक्केवारी मिळते त्यामुळे त्या कामांना जास्त महत्त्व दिले जाते तर पाण्याची संबंधित असलेल्या कामांमध्ये केवळ पाच टक्के टक्केवारी मिळत असल्याने त्याकडे दुर्लक्ष दिल्या जात असल्याचा आरोपही हर्षवर्धन जाधव यांनी केला

उपोषण सुरू राहील

मनपा प्रशासनाने लेखी आश्वासन दिले तरीही ते मी घेणार नाही जोपर्यंत प्रत्यक्षात कृती करत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील असा इशाराही हर्षवर्धन जाधव यांनी दिला आहे

बातम्या आणखी आहेत...