आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाची मोहीम:तासाभरापेक्षा जास्त पाणी येणाऱ्या 90 व्यावसायिक नळांना वॉटर मीटर ; 400 मीटर बसवण्याचे टार्गेट

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्यांनी व्यावसायिक कनेक्शन घेतले आहे, त्यांना आता लिटरप्रमाणे पैसे देऊन पाणी विकत घ्यावे लागणार आहे. मागील दोन दिवसांपासून मनपाचे पथक मीटर बसवत आहे. नऊ झोनमध्ये ९० मीटर बसवण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात ४०० मीटर बसवण्याचे टार्गेट देण्यात आले आहे.

हॉटेल, हॉस्पिटल, महाविद्यालय, शाळा, सरकारी कार्यालये, अपार्टमेंट, सभागृहांना मीटर बसवण्यात येणार आहे. बहुतांश आस्थापनांनी मीटर बसवण्यास आक्षेप घेतला नाही. जुन्या दरानुसार ८९ रुपयांमध्ये हजार लिटर पाणी मिळणार आहे. यापुढे हा दर बदलू शकतो असे मनपाकडून सांगण्यात आले. शहरात सर्वत्र पाच दिवसांआड समान पाणी वाटप व्हावे या मागचा हेतू आहे. जायकवाडी ते फारोळा आणि फारोळा ते नक्षत्रवाडी या मार्गातील कंपन्या, ग्रामपंचायतींना मीटर बसवण्यात आले आहेत. शिवाय त्यांच्या पाण्यात कपात करण्यात आली आहे, अशी माहिती प्रभारी मनपा प्रशासक तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण दिली.

तीन झोन मिळून एक अधिकारी : शहराचे नऊ झोन आहेत. झोन ७ ते ९ ची जबाबदारी उपअभियंता अशोक पद्मे यांच्याकडे, झोन ३ ते ५ के. एम. फालक तर उर्वरित इतर झोनची जबाबदारी उपअभियंता मोरे यांच्याकडे आहे. एसएफएस समोरील व्यावसायिक कनेक्शन, गजानन महाराज मंदिर ते डॉ. हेडगेवार हॉस्पिटल, जळगाव रोड, मौलाना आझाद कॉलेज रोड, जालना रोड या भागात मीटर बसवण्याचे काम सुरू आहे.

अर्धा इंची कनेक्शनसाठी सर्वाधिक ३०० मीटर शहरातील जलकुंभ भरण्यासाठी असणाऱ्या पाइपलाइनवरील कनेक्शन ताेडण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत. विरोध करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. या फीडर लाइनशिवाय ज्या मुख्य वसाहतीत जाणाऱ्या पाइपलाइनवर कनेक्शन आहे, त्यांना एका तासापेक्षा अधिक पाणी येते. या लाइनवरील वॉटर कनेक्शनला मीटर बसवले जाईल. शहरात असे हजारपेक्षा अधिक कनेक्शन असतील, असा अंदाज आहे. अर्धा इंची कनेक्शनसाठी ३०० मीटर, पाऊण इंचीसाठी ६०, एक इंचीसाठी २० आणि दोन इंचीसाठी २० मीटर बसविण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...