आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदूषणाचा नद्यांना फटका:गाळामुळे साठवण क्षमता कमी नदी संवाद यात्रेचे यशस्वी आयोजन करा- आस्तिक कुमार पांडेय

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादमध्ये ‘चला जाणूया नदीला’ अभियानामध्ये जिल्ह्यातील शिवना, दुधना आणि खाम नदीचा समावेश करण्यात आलेला आहे. या अभियानांतर्गत ‘नदी संवाद यात्रे’चे यशस्वी आयोजन करण्यात येणार आहे. प्रदूषणाचा फटका नद्यांना बसत आहे.त्यामुळे या अभियानात लोकसहभाग महत्वाचाअसून सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी दिले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातंर्गत ‘चला जाणूया नदीला’ या अभियानासाठी गठीत जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते.

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात चला जाऊया नदीला हे अभियान राबविण्यात येत आहे या माध्यमातून जिल्ह्यातील नद्यांची स्वच्छता तसेच विद्यार्थी युवकांमध्ये जनजागृती आणि नदी बाबत विविध उपायोजना करण्यात येत आहेत

प्रदूषणामुळे नदीवर परिणाम

जिल्हाधिकारी म्हणाले की, प्रदुषणासारख्या वाढत्या समस्यांमुळे उपलब्ध भुपृष्ठजलाची उपयुक्तता घटत आहे. नद्यांमध्ये तसेच जलाशयामध्ये आलेल्या गाळामुळे त्यांची वहन क्षमता तसेच साठवण क्षमता कमी झालेली आहे. या सर्व बाबींचा विचार करता नदीला जाणून घेणे आणि तिच्या समस्यांचा अभ्यास करुन त्यांची सोडवणूक करण्यासाठी ‘चला जाणूया नदिला’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वप्रथम नदीचे आरोग्य जाणून घेऊन नदीचे आजार काय आहेत हे माहिती करुन घेणे आवश्यक आहे. यासाठी उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर सूक्ष्म कृती आराखडा बनवून तिन्ही नद्यांचे सर्वेक्षण करा. नदी संवाद यात्रेचे यशस्वी आयोजन करण्याचे निर्देश देखील यावेळी जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी दिले.

खाम नदीपासून अभियानाची सुरुवात

यावेळी खाम नदीच्या पुनरुजीवन अभियानाची ध्वनिचित्रफित देखील उपस्थितांना दाखविण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी आप्पसाहेब शिंदे, अभियानाचे समन्वयक गोकुळ सुरासे तसेच विविध यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...