आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी उपसा बंद:जायकवाडी पंपहाऊसचा पाणी उपसा सव्वा तास बंद

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उच्च न्यायालयाने पाणी पुरवठ्याबाबत ताशेरे ओढले असताना गुरुवारी पुन्हा जायकवाडी पंप हाऊसमधील पाणी उपसा सव्वासात तास बंद होता. जायकवाडी धरणातील पंपगृहाच्या मेन पॅनलमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला. परिणामी, शहराचा पाणीपुरवठा आणखी काही दिवस विस्कळीत राहणार आहे.

मागील आठवड्यात बिडकीनजवळ ७०० मिमीच्या जुन्या जलवाहिनीला मोठा तडा गेला. या काळात नवीन जलयोजना सुरू असली तरी जुन्या योजनेवरील ३० तासांच्या खंडकाळामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला. त्यानंतर फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रातील जुन्या योजनेवरील प्रोसेसिंग पंपगृहातच बिघाड झाला. दरम्यानच्या काळात शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने केला. पाणीपुरवठ्याचे टप्पे सुरळीत करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू असतानाच १९ सप्टेंबर रोजी जायकवाडी पंपगृहातील नवीन १०० एमएलडी क्षमतेच्या जलयोजनेच्या मेन पॅनलच्या फीडरमध्ये उंदीर गेल्यामुळे स्पार्किंग झाल्याचे निदर्शनास आले. त्याच्या दुरुस्तीनंतर तब्बल १२ तासाने शहरात पाणी आले. २२ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी नवीन योजनेवरील पंपिंग अचानक बंद झाले. मेन पॅनलची कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता इनकमर-१ मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. त्याची दुरुस्ती दुपारनंतर साडेचार वाजता पूर्ण झाली. त्यानंतर शहरात पाणी आले.

मनपाला नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा
आठवड्यातून चार वेळा पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे शहरातील जलकुंभ रिकामे आहेत. अनेक वसाहतींतील नागरिकांना पाण्याची प्रतीक्षा करावी लागली. नळांना पाणीच येणार नसल्याचे कळाल्यानंतर काहींना खासगी टँकरचा आधार घ्यावा लागला. तांत्रिक बिघाडामुळे शहराचा पाणीपुरवठा आणखी काही दिवस विस्कळीत राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने जाहीर पत्रकाद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच नागरिकांना सहकार्याचे आवाहनही केले आहे.

बातम्या आणखी आहेत...