आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाचे दुर्लक्ष:शिवशंकर कॉलनीत पाणीटंचाई; आठ दिवस उलटूनही नागरिक तहानलेलेच, नागरिकांना रोज जारचे पाणी विकत घेऊन भागवावी लागते तहान

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा असतानादेखील शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आठ ते दहा दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. ‘धरण उशाला अन् कोरड मात्र घशाला’ अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.

शहरातील सिडको-हडको या भागासह शिवशंकर कॉलनी भागातही गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. आठ ते नऊ दिवस उलटूनही पिण्याचे पाणी मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत नागरिकांनी प्रशासनाला सांगूनही सुरळीत पाणीपुरवठा होत नाही.

त्यामुळे भरउन्हाळयात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या भागातील अनेक नागरिकांना रोज जारचे पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे. याबाबत येथील नागरिकांनी दैनिक दिव्य मराठीशी बाेलताना प्रतिक्रिया दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...