आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन:पुन्हा बदलणार पाण्याचे वेळापत्रक; शहराला आता चार दिवसांआड पाणी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यायालयाच्या आदेशानंतर ६० टक्के शहराला तीन दिवसांआड, ४० टक्के शहराला सहा दिवसांआड पाणी देण्याचे नियोजन कोलमडल्यानंतर आता पुन्हा पुन्हा चार दिवसांआड पाणी देण्यासाठी नव्याने वेळापत्रक तयार करण्याचे काम मनपाने सुरू केले आहे. त्यानुसार सोमवारी (६ फेब्रुवारी) अनेक भागांना पाचव्या दिवशी पाणीपुरवठा केल्याची माहिती कार्यकारी अभियंता एम. बी. काझी यांनी दिली.

महापालिकेने तीन आणि पाच दिवसांआड पाणीपुरवठा सुरू केला हाेता. ही साखळी दर पंधरा दिवसांनी बदलण्यात आली. परंतु पाणीपुरवठ्यात अडचण येत असल्याने मनपाने उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सरसकट पाचव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यासाठी विनंती केली. त्यानंतर न्यायालयाने पुन्हा चार दिवसांआड पाणी देण्याचे आदेश दिले. त्याची सोमवारपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. मनपाने संपूर्ण शहरासाठी चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे वेळापत्रक तयार करून ते लागू केले आहे, असे काझी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...