आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेळापत्रक:फारोळ्याजवळ जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलणार

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न मनपाकडून होत असताना बुधवार, ५ एप्रिल रोजी नव्या पाणीपुरवठा योजनेचे काम करताना जुन्या पाणीपुरवठा योजनेचा एअर व्हॉल्व्ह फुटला. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास फारोळ्याजवळ हा प्रकार घडला. या दुरुस्तीसाठी किमान सात तास लागण्याची शक्यता असल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवसाने पुढे ढकलले जाईल, अशी माहिती मनपाने दिली.

जायकवाडी ते नक्षत्रवाडीदरम्यान नवीन पाणीपुरवठा योजनेची २५०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. फारोळा गावाजवळ जलवाहिनी टाकण्यात येत होती. जेथे हे काम सुरू होते तेथून काही अंतरावर जुनी जलवाहिनी आहे. तिच्या एअर व्हॉल्व्हच्या संरक्षणासाठी १४०० मिमीचा पाइप उभा करून ठेवला होता. नवीन जलवाहिनीचे काम सुरू असताना या पाइपला धक्का लागला आणि हा पाइप एअर व्हॉल्व्हवर पडला, त्यामुळे एअर व्हॉल्व्ह फुटला. दुरुस्तीसाठी किमान सात तास लागतील. तेवढा वेळ लागला तर पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवसाने पुढे ढकलले जाऊ शकते. गुरुवारी शहराच्या ज्या भागात पाणीपुरवठा होणार आहे त्या भागात शुक्रवारी पाणीपुरवठा होईल.