आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरवासीयांना उन्हाळ्यात पाणीप्रश्न भेडसावतो. यात छावणी परिसरातील मनपा हद्दीतील लक्ष्मी कॉलनी, अशोकनगर, प्रज्ञानगर परिसरात आठ दिवसांआड पाणी येते, तेही कमी दाबाने येते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. नागरिकांना छावणीतून पाणी आणावे लागत आहे. या परिसरातील नागरिकांना रखरखत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
विशेष म्हणजे छावणी परिषदेअंतर्गत येणाऱ्या सात वॉर्डांना दर दोन दिवसांनी पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे या परिसरात पाणीटंचाई दिसून येत नाही. मात्र, या भागाला लागूनच असलेल्या लक्ष्मी कॉलनी, अशोकनगर व प्रज्ञानगर परिसरात कमी दाबाने आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. असा भेदभाव का केला जातो, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
जायकवाडीत मुबलक पाणी असूनही शहरात पाणीटंचाई आहे. लक्ष्मी कॉलनी, अशोकनगर, प्रज्ञानगर परिसरात आठ दिवसांनी पाणी मिळत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. मनपाने पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे. आतापर्यंत अनेक वेळा निवेदने दिली आंदोलनेही केली. परंतु पाणीप्रश्न सुटलेला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.