आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी चोरावर शिवसेनेची नजर:व्यावसायिक संस्था, हॉटेल्स, इंडस्ट्रीजवर निर्बंध घालणार; आमदार दानवेंचा इशारा

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद शहरातील सर्वसामान्य जनतेचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी व्यावसायिक संस्था, हॉटेल्स, इंडस्ट्रीजमधील पाणी चोरीचा शोध घेऊन अती पाणीवापरावर निर्बंध घातले जाणार आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने पाऊल उचलले आहे. आम्ही त्यावर नजर ठेवून आहोत, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी दिली.

मनपा प्रशासनाचे पाऊल

जायकवाडीत 30 टक्के जलसाठा आहे. मात्र, शहरातील नागरिकांना आठ ते दहा दिवसानंतर पिण्याचे पाणी मिळते. त्यातही वारंवार वीज पुरवठा खंडीत होतो. पुरेशा दाबाने पिण्याचे पाणी नळाला येत नाही. यामुळे जनता हैराण झाली आहे. पाण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून आक्रोश सुरू आहे. मुलभूत पाण्याची समस्या सोडवण्यासाठी स्थानिक ते मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारीचा पाऊस पडला आहे.

पाच दिवसांआड पाणी

दानवे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेत झालेल्या सभेत नागरिकांना पहिले पिण्याचे पाणी द्यावे. यात हायगय करू नये, अशा प्रकारचे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सत्ताधारी शिवसेनिकही कामाला लागले आहेत. तसेच मनपा प्रशासनानेही पाच दिवसाआड पिण्याचे पाणी देण्यासाठी उपाययोजना सुरू केली आहे. त्यानुसार व्यावसायिक संस्था, हॉटेल्स, इंडस्ट्रीज चालकांनी मनमानी करून मोठे नळ बसवून घेतले आहेत. त्यांचा शोध घेऊन अतिरिक्त पाण्याची चोरी व अती पाण्याच्या वापरावर निर्बंध घालण्यासाठी मनपा प्रशासन अ‌ॅक्शन मोडवर आले आहे. या कारवाईतून बचत होणारे पाणी गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

विहिरींच्या कामांची पाहणी

शहराला सुरळीत व मुबलक पाणी पुरवठा करता यावा, यासाठी जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त सुनील चव्हाण यांनी मंगळवारी हिमायत बागमधील विहिरींच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. गुणवत्तापूर्ण व वेळेत काम करण्याच्या सुचना त्यांनी संबंधितांना केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...