आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:पैठण तालुक्यातील 171 गावांना वर्षभरात पाणी; वाॅटरग्रीडच्या कामाला झाली सुरुवात

रमेश शेळके | पैठण2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • छत्रपती संभाजीनगरची पाणी योजना मुंगीच्या पावलाने सुरू; वर्षभरात पैठणची योजना

वाॅटरग्रीड योजनेंतर्गत तालुक्यातील १७१ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वर्षभरात सुटणार असून जायकवाडी धरणातून पाणी उपलब्ध करून देण्याबाबत परवानगीचा प्रस्ताव पाठवला आहे. वडाळा येथे सहा एकर जागेवर जलशुद्धीकरण केंद्रासाठी जागा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने घेतली असून तीन किमी पाइप टाकण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांनी दिली. एकीकडे छत्रपती संभाजीनगरसाठी जाहीर झालेल्या २७०० कोटी रुपयांच्या जलवाहिनी योजनेचे काम मुंगीच्या पावलाने सुरू आहे. दुसरीकडे पैठणची योजना पहिल्या टप्प्यात गतीने प्रगती करत असल्याचे दिसत आहे.

‘धरण उशाला अन् काेरड घशाला’ अशी आेरड नेहमीच तालुक्यातील लाेकांकडून अनेक वर्षांपासून एेकायला मिळते. विशेष म्हणजे जायकवाडी धरणालगत अर्धा किमी अंतरावरावरील अनेक गावांनाच नाही, तर जायकवाडी धरणाच्या भिंतीलगतच्या वसाहतीलाही जायकवाडीच्या धरणाचे शुद्ध पाणी मिळत नाही. तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी सामना करावा लागताेय, तर पैठण-छत्रपती-संभाजीनगर रोडवरील आणि पाचोड रोडवरील काही गावे ही छत्रपती संभाजीनगर व जालना पाइपलाइनच्या चेंबरवर आपली तहान भागवतात. मात्र, आता वडाळा या ठिकाणाहून वाॅटरग्रीडच्या कामाला प्रारंभ झाल्याने धरणाचे पाणी थेट १७१ गावांत पाेहाेचणार आहे. वर्षभरात जलशुद्धीकरण केंद्र वडाळा व धरणातून पाणी त्या ठिकाणी जाईल. आठ ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्राचे सबस्टेशन्स तयार करण्यात येणार आहे, असे मजीप्राने केल्याचे कोळी यांनी सांगितले. दरम्यान, पैठण तालुक्यातून वाॅटरग्रीडचे काम सुरू झाले. वर्षभरात योजना मार्गी लागून तालुक्यातील सर्व गावांना जायकवाडी धरणाचे शुद्ध पाणी मिळेल. लवकर काम कसे होईल, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सूचना केल्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे म्हणाले.