आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा:गुंठेवारीतील वसाहतींना साडेसहा काेटी खर्चून टँकरने देणार पाणी

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुंठेवारी भागात राहणाऱ्या नागरिकांना महापालिकेकडून खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. मागील वर्षी तब्बल ११ कोटींची निविदा काढली होती. यंदा ही रक्कम थेट साडेसहा कोटींवर आली आहे. २०१२ नंतर मनपाने गुंठेवारी भागात राहणाऱ्या नागरिकांना टँकरद्वारे पाणी देण्याचा निर्णय घेतला. यासाठी संबधितांकडून आगाऊ स्वरूपात पैसे घेतले जातात. आठवड्यातून एक किंवा दोन ड्रम पाणी दिले जाते. त्यासाठी कंत्राटदार नियुक्त केला आहे. मागील वर्षी नियुक्त कंत्राटदाराचा कार्यकाळ संपला. पाणीपुरवठा विभागाने निविदा प्रक्रिया सुरू केली. तीन महिने उलटले तरी निविदा प्रक्रियेलाच मान्यता मिळाली नाही. मागील वर्षी ११ कोटींची निविदा प्रसिद्ध केली होती. यंदा साडेसहा कोटींसाठी मंजुरी मागितली आहे.

बातम्या आणखी आहेत...